Dev Deepawali 2023 :  दिवाळी झाल्यानंतर वेध लागतात ते देव दीपावली किंवा देव दिवाळीचे. दिवाळी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते. तर देव दिवाळी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला असते. देव दिवाळी का साजरी केली जाते आणि त्या मागील कारण काय? यंदाची देव दिवाळी अतिशय शुभ असून या दिवशी 3 शुभ योग असणार आहे. (Dev Deepawali 2023 date importance and shubh muhurt and Dev Diwali 2023 made 3 auspicious yoga)


देव दिवाळी तिथी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंचांगानुसार कार्तिक पौर्णिमा तिथी 26 नोव्हेंबर 2023 दुपारी 03.53 वाजेपासून 27 नोव्हेंबर 2023 ला 02.45 वाजेपर्यंत असणार आहे. कार्तिक पौर्णिमेला प्रदोष व्यापिनी मुहूर्तावर देव दिवाळी साजरी केली जाते. त्यामुळे 26 नोव्हेंबरला देव दिवाळी साजरी केली जाणार आहे. 


देव दिवाळीला 3 शुभ योग!


यंदा देव दिवाळीला 3 शुभ योग असून त्या दिवशी रवियोग, परिघ योग आणि शिवयोग आहे. देव दिवाळीला सकाळी 06:52 पासून रवि योग सुरू होणार असून तो दुपारी 02:05 पर्यंत आहे. तर परिघ योग पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत 12.37 पर्यंत असणार आहे. त्यानंतर शिवयोग सुरू होणार असून तो कार्तिक पौर्णिमेच्या रात्रीपर्यंत असणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Tulsi Vivah : तुळशी विवाहाला जुळून येतायेत 3 शुभ योग; जाणून घ्या तारीख, पूजा, शुभ मुहूर्त


देव दिवाळीचा शुभ मुहूर्त


देव दिवाळी 26 नोव्हेंबरला दिवशी संध्याकाळी 5:08 मिनिटांपासून 7:47 मिनिटांपर्यंत म्हणजेच प्रदोष काळात देव दिवाळी साजरी करण्यासाठी शुभ मुहूर्त असणार आहे. 


देव दिवाळी का साजरी केली जाते?


धार्मिक मान्यतेनुसार,  भगवान शिवाने दैत्य राजा त्रिपुरासुराचा वध करून देवांना त्यांच्या दहशतीतून मुक्त केलं होतं अशी आख्यायिका आहे. त्यावेळी प्रदोष काळात देव-देवतांनी शिवनगरी काशीमध्ये गंगेच्या तीरावर स्नान करुन दिवे लावले आणि भगवान शंकराची पूजा केली होती. तेव्हापासून दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला काशी शहरातील गंगेच्या घाटांवर देव दिवाळी साजरी करण्याची परंपरा आजही पाळली जाते आहे. असं म्हणतात कार्तिक पौर्णिमेला सर्व देव पृथ्वी तलावर येतात. असं म्हणतात की देव दिवाळी साजरी केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि तुम्हाला वरदान प्राप्त होतं.


 हेसुद्धा वाचा - Mahalaxmi Yoga : देवउठनी एकादशीला महालक्ष्मी योग! 148 दिवसानंतर निद्रेतून उठणारे विष्णूदेव 'या' लोकांना करणार श्रीमंत



(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)