Devshayani Ekadashi Mystery: आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकदशीला पंढरपुरात वैष्णवांचा मेळा जमतो. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. या दिवसानंतर भगवान विष्णू चार महिने योगनिद्रेत जातात. त्यानंतर कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला निद्रेतून जागे होतात. या चार महिन्यांना चातुर्मास संबोधलं जातं. विष्णूंनी निद्रा घेतल्यानंतर सर्व शुभ कार्य थांबतात. या दरम्यान विवाह, मुंडन, गृह प्रवेश असे कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. भगवान श्री हरी चार महिने झोपायला जाण्याचे कारण काय? जाणून घेऊयात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्री विष्णू 117 दिवस का झोपतात?


या चार महिन्यांना चातुर्मास म्हणतात. हे पावसाळ्याचे दिवस असल्याने जगात पुराचा धोका असतो. या दरम्यान अनेक प्रकारच्या आपत्ती घडण्याची शक्यता असते. त्याच वेळी सूर्य दक्षिणेकडे कूच करतो आणि कर्क राशीत प्रवेश करतो. ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीचे चिन्ह खेकडा आहे. खेकडा सूर्यप्रकाश खातो असं म्हटलं जातं  अशा परिस्थितीत दिवस लहान आणि रात्र मोठी होऊ लागते.
त्याचवेळी भगवान विष्णू निद्रा घेतात अशी श्रद्धा आहे. या दरम्यान भगवान विष्णू आपल्या वेगवेगळ्या अवतारांवर जग हाताळण्याचे काम सोपवतात.


या दिवशी भगवान विष्णूंना झोपण्यासाठी काही नियमांचे पालन केले पाहिजे. या दिवशी विष्णूंना पंचामृताने स्नान घालतात. नंतर धूप-दीप लावून पूजा केली जाते. यानंतर भगवान विष्णूच्या झोपेसाठी पलंग तयार केला जातो. या दिवशी भगवान विष्णूला पिवळ्या वस्त्रावर झोपवले जाते. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)