December 2022 Rajyog: प्रत्येक महिन्यातील ग्रह गोचराकडे ज्योतिष्यांचं लक्ष लागून असतं. कोणता ग्रह कोणत्या राशीत आहे आणि ग्रहाची युती शुभ की अशुभ यावर भाकीत केलं जातं. ग्रहांच्या स्थितीचा राशीचक्रातील 12 राशींवर परिणाम होत असतो. नुकतंच शनि आणि गुरु हे ग्रह मार्गस्थ झाले आहेत. तर  13 नोव्हेंबरला मंगळ ग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे. वृषभ या राशीचा स्वामी शुक्र आहे आणि दुसरीकडे शुक्र ग्रहाने मंगळाचं स्वामित्व असलेल्या वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. मंगळ आणि शुक्राच्या या स्थितीमुळे धन राजयोग तयार झाला आहे. 5 डिसेंबरपर्यंत ही स्थिती असणार आहे. त्यानंतर शुक्र धनु राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे 5 डिसेंबरपर्यंत तीन राशींना फायदा होणार आहे. 


या तीन राशींना धन राजयोगाचा होणार फायदा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- धन राजयोग वृष राशीसाठी लाभदायी ठरणार आहे. या काळात या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. हाती घेतलेली काम पूर्णत्वास येतील. तसेच लोकांना आपल्याकडे आकर्षित करू शकता. हा काळ लग्नासाठी अनुकूल आहे. ग्लॅमर, मीडियाशी निगडीत लोकांना फायदा होतील. प्रत्येक कामात यश मिळेल. या काळात एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. 


कर्क- या राशीच्या लोकांना धन राजयोग फलदायी ठरेल. करिअरमध्ये प्रगती दिसून येईल. पैसा, पद आणि सन्मान मिळेल. तसेच जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. विवाह जमण्यास हा काल अनुकूल आहे. या काळात अडकलेली कामं मार्गी लागतील. 


बातमी वाचा- Panchak 2022: नोव्हेंबर महिन्याच्या या दिवसापासून लागणार 'अग्नि पंचक'! चुकूनही या बाबी करू नका


धनु- धन राजयोग या राशीसाठी लाभदायी असणार आहे. मंगळ आणि शुक्रामुळे धनु राशीला फायदा होईल. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल आणि पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. अडकलेले पैसे मिळण्यासाठी अनुकूल काळ आहे. नोकरी शोधणाऱ्यांसाठी या काळात नोकरी मिळू शकते. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)