नवी दिल्ली : धनत्रयोदशी १७ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी धनाची पूजा करण्यात येते. तसेच सोनं खरेदीसाठीही हा दिवस फार चांगला आणि उत्तम असल्याचं मानलं जातं. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी नागरिक मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं खरेदी करण्यासाठी पंचांगामध्ये शुभ मुहूर्त देण्यात आलेला आहे. हा शुभ मुहूर्त सायंकाळी ७ वाजून २० मिनिटांपासून रात्री ८ वाजून १७ मिनिटांपर्यंत असणार आहे. या शुभ मुहूर्तावर कुठलीही वस्तू खरेदी केल्यास ते लाभदायक असल्याचं बोललं जातं. तसेच धन्वंतरी देवाची कृपाही सदैव आपल्यावर राहते.


धनतेरस म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवाचा जन्म झाला होता. यामुळेच या दिवशी धनतेरसच्या रुपाने साजरं केलं जातं. कार्तिक महिन्यात कृष्ण पक्षाची त्रयोदशी तिथीच्या दिवशी यम आणि कुबेरची पूजा केली जाते. धनत्रयोदशी सामान्य रुपात दिवाळीपूर्वी दोन दिवस आधी बनवली जाते आणि नागरिक मोठ्या उत्साहात ही धनत्रयोदशी साजरी करतात.


धनत्रयोदशीच्या दिवशी सामान्यत: नागरिक सोनं-चांदी, भांडी, अलंकार आणि इतर दागिन्यांची खरेदी करतात. असं मानलं जातं की, या दिवशीच्या शुभ मुहूर्तावर खरेदी केल्यास वस्तुंमध्ये तेरा गुणांनी वाढ होते. त्यासोबतच लक्ष्मी माता आनंदी होते. या कारणामुळे प्रत्येकजण धन्वतरी देवाची आणि लक्ष्मी मातेची कृपा नागरिकांवर राहते.


धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त:


धनत्रयोदशीच्या दिवशी सायंकाळी ७ वाजून १९ मिनिटांपासून रात्री ८ वाजून १७ मिनिटांपर्यंतचा शुभ मुहूर्त आहे.


सकाळी ७.३३ मिनिटांपर्यंत - खाद्यान्न


९ वाजून १३ मिनिटांपर्यंत - वाहन, मशीन, कपडे, शेअर, घरगुती सामान


दुपारी २.१२ मिनिट - गाडी, गतिमान वस्तू


दुपारी ३.५१ मिनिट - मशीन, औजार, कम्प्युटर, शेअर खरेदी


सायंकाळी ५ वाजून ३१ मिनिट - भांडी, कपडे, स्टेशनरी खरेदीसाठी चांगली वेळ


सायंकाळी ७.११ मिनिट - घरगुती सामान खरेदीसाठी चांगली वेळ आहे