मुंबई : दिपावलीच्या पाच दिवसातील आजचा पहिला दिवस तो म्हणजे धनत्रयोदशी.... दिपावलीची सुरूवात धनत्रयोदशीच्या दिवशी दिवे लावून केली जाते. या दिवसाला दिवाळीचा प्रारंभ दिवस समजला जातो. धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर देवता आणि मृत्यूदेव यमराजची पूजा - अर्चना केली जाते. या दिवशी याला खूप महत्व असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कधी असते धनत्रयोदशी 


कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला धनाच्या देवीच्या उत्सवाला प्रारंभ केला जातो. कारण हा दिवस धनत्रयोदशीच्या नावाने साजरा केला जातो. या दिवशी पाच देवांना म्हणजे श्रीगणेश, लक्ष्मी, ब्रम्हा, विष्णु आणि महेश यांची पूजा केली जाते.


अशी आख्यायिका आहे की, कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीच्या दिवशी समुद्र मंथन झाले आणि त्या दिवशी धन्वंतरी देवी आपल्यासोबत अमृत कलश आणि आयुर्वेद घेऊन प्रकट झाली. याचमुळे धन्वंतरी देवीला आयुर्वेदाचे जनक म्हटले जाते. 



दिवे लावणं शुभ 


धनत्रयोदशीच्या दिवसांपासून दिवे लावणे शुभ मानले जाते. या दिवसापासूनच खऱ्या अर्थाने दिवाळीची सुरूवात होते. धनत्रयोदशीचा दिवस आकाशातील बारावे नक्षत्र उत्तराफाल्गुनीसोबत साजरे केले जाते. याचा स्वामी सूर्यदेव मानला जातो. 



धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त 


या दिवशी कुबेर देवतेचे अनन्य साधारण महत्व असते. यावर्षी पूजेचा मुहूर्त संध्याकाळी 6.57 ते रात्री 8.49 पर्यंत आहे. संध्याकाळऐवजी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर दुपारी 1 ते 2.30 पर्यंत खरेदी करायची आहे. तसेच संध्याकाळी 5.35 ते 7.30 हा शुभ मुहूर्त आहे.