मुंबई : जन्मकुंडलीतील ग्रहस्थिती आणि नक्षत्रांचा माणसाच्या जीवनावर खूप खोल परिणाम होतो. ज्योतिष शास्त्रामध्ये कुंडलीतील ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार आणि घटनांनुसार रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. रत्न हे सर्वांनाच आवडतात. मात्र तुम्हाला माहितीये का कोणतंही रत्न परिधान करण्यापूर्वी विद्वान ज्योतिषाचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्न शास्त्रामध्ये अशा दोन रत्नांचं वर्णन आहे, जे परिधान केल्याने माणसाच्या जीवनावर खूप खोल परिणाम होतो. ही रत्नं जितकी शक्तिशाली आहेत तितकीच ती धोकादायक परिणामही देऊ शकतात. जाणून घेऊया या दोन रत्नांविषयी.


हिरा रत्न


हिरा नवरत्नांमध्ये सर्वात मौल्यवान, कठोर आणि चमकदार रत्न आहे. त्यामुळे हिऱ्याचे तेज सर्वांनाच आकर्षित करतं. हिरा धारण केल्याने माणसाला सुख, शांती, साधन आणि ऐश्वर्य प्राप्त होते, असं ज्योतिषशास्त्रात म्हटलं गेलंय. यासोबतच हिऱ्याचा प्रभाव व्यक्तीच्या वैवाहिक जीवनावरही पडतो.


हिरा घालण्याचे नियम


ज्योतिष शास्त्रामध्ये नमूद केल्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीला हिरा फलदायी असेल तर तो त्या व्यक्तीचं नशीब उजळतं. परंतु हिरा घालण्यापूर्वी काही खास गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण विचार न करता हिरा धारण केल्याने नुकसान होऊ शकतं. यामध्ये व्यक्तीला तोटा सहन करावा लागू शकतो.


अशा व्यक्ती ज्यांना मधुमेह, रक्ताशी संबंधित आजार आहेत, त्यांनी हिरा अजिबात घालू नये. वैवाहिक जीवनात समस्या येत असतील तर अशा व्यक्तींनी हिरा घालू नये. ज्योतिषशास्त्रात असं सांगितलंय की, 21 ते 50 वर्षे वयोगटातील व्यक्ती हिरा घालू शकते.


नीलम रत्न


नीलम हे ज्योतिष आणि रत्नशास्त्रातील दुसरं सर्वात शक्तिशाली रत्न मानलं जातं. यासोबतच हे रत्नही तितकंच धोकादायक आहे. नीलम हे शनिदेवाचं रत्न मानलं जातं. शनिदेवाच्या उग्र स्वभावामुळे नीलम रत्न इतर कोणत्याही व्यक्तीसोबत धारण करू नये. 


नीलम रत्न परिधान करण्याचे नियम


अनेकदा लोक नकळत सोन्यामध्ये किंवा कोणत्याही मिश्र धातुमध्ये नीलम रत्न परिधान करतात, परंतु हे योग्य नाही. जर एखाद्या व्यक्तीला नीलम रत्न घालायचं असेल तर तो लोखंडी किंवा चांदीच्या अंगठीत घालल्यानंतरच परिधान करावा. याशिवाय नेहमी चौकोनी आकाराचा नीलम घालावा. नीलम हे शनिदेवाचं रत्न मानलं जातं, त्यामुळे शनिवारी पूजा केल्यानंतर मध्यरात्री ते धारण करावं.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)