मुंबई : दिवाळी सण देवी लक्ष्मीच्या आगमनाचा सण. असे मानले जाते की, दिवाळीला देवी लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते. सोबतच घरात लक्ष्मीचं वास्तव्य राहतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे दिवाळीला घराची साफ-सफाई केलीए जाते. जेणेकरून लक्ष्मी घरात वास्तव्य करेल. त्यामुळे घराच्या साफ-सफाईसोबतच काही चुकीच्या सवयी बदलणे सुद्धा गरजेचे आहे. त्या बदलल्या नाही तर घरात लक्ष्मी येणार नाही, असे मानले जाते. 


दिवाळीआधी घरातून तुटलेल्या वस्तू बाहेर काढल्या पाहिजे. असे मानले जाते की, घरात तुटलेल्या-फुटलेल्या वस्तू ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे तुम्हाला नुकसानही होऊ शकतं. 


- घरात सायंकाळी झाडझूड अजिबात करू नये. अशी मान्यता आहे की, मां लक्ष्मी अशा घरात प्रवेश करत नाही. 


- दात स्वच्छ ठेवणे सुद्धा अतिशय महत्वाचे आहे. यानेही लक्ष्मी प्रसन्न होत नाही. 


- झाडूला लक्ष्मीचं रूप मानलं जातं. त्यामुळे घरात दिवाळीला नवीन झाडू आणले जातात. त्याची पूजा केल्यावरच त्याचा वापर केला जातो.