दिवाळी २०१७ : २७ वर्षांनी आलाय दुर्मिळ योग, या मुहूर्तावर करा खरेदी आणि पूजा
प्रत्येक वर्षी कार्तिक मासाच्या अमावसेच्या दिवशी दिवाळी साजरी केली जाते. यंदा दिवाळीला फारच शुभ योग जुळून आला आहे. यंदा दिवाळी १९ ऑक्टोबरला आली आहे.
मुंबई : प्रत्येक वर्षी कार्तिक मासाच्या अमावसेच्या दिवशी दिवाळी साजरी केली जाते. यंदा दिवाळीला फारच शुभ योग जुळून आला आहे. यंदा दिवाळी १९ ऑक्टोबरला आली आहे.
यंदा दिवाळीत तब्बल २७ वर्षांनी गुरू आणि चित्रा नक्षत्रांचा महासंयोग होणार आहे. त्यामुळे या दिवशी महालक्ष्मी आणि श्रीगणेशाची पूजा करणे अधिक फलदायक असल्याचे सांगितले जात आहे.
या दिवशी घरातील साहित्य, इतर खरेदी करणे अधिक चांगले असल्याचे मानले जात आहे. याआधी असा योग १९९० मध्ये आला होता. ज्योतिषाचार्य आचार्य इंदु प्रकाश यांच्यानुसार, अमावस्या तिथी, गुरूवार आणि चित्रा नक्षत्र एकत्र येण्याचा योग फार कमी वेळा येतो. गुरूला सोनं, जमीन, कॄषीसाठी चांगलं मानलं जातं. तर चित्रा नक्षत्र चांदी, कपडे, वाहन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी चांगलं मानलं जातं.