Remedies to please Maa Lakshmi:  कार्तिक महिन्यातील अमावास्येला दिवाळी (Diwali 2022) साजरी केली जाते. विशेषत: हिंदू धर्मीय लोक या सणाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. त्यातच आता दसऱ्यानंतर दिवाळीची लगबग पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा करण्यात येते. लक्ष्मीला (laxmi pujan 2022)  प्रसन्न करण्यासाठी लोक पूजेसोबत विविध उपायही करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माँ लक्ष्मीच्या आशीर्वादाने आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. यावेळी 24 ऑक्टोबरला दिवाळी साजरी होणार आहे. या दिवशी आणखी काय उपाय केल्यानंतर मां लक्ष्मी प्रसन्न होते ते जाणून घेऊया...


- अनेकदा आपण केलेलं काम पुर्णपणे बिघडून जातं. या समस्येवर मात करण्यासाठी दिवाळीत (Diwali 2022) रोटी बनवा आणि त्याचे चार समान तुकडे करा. पहिला भाग गाय, दुसरा भाग काळा कुत्रा, तिसरा कावळा आणि शेवटचा भाग घराजवळच्या चौकात ठेवा. असे केल्याने या समस्येपासून मुक्तता मिळेल. 


- तसेच दिवाळीच्या दिवशी विवाहित स्त्रीला घरी बोलवून तिला जेवण आणि गोडधोड द्या. त्यानंतर त्या स्रिला लाल रंगाचे कपडे द्या. हे सर्व करताना विवाहित स्त्री तरुण असावी हे लक्षात ठेवा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो.


- दिवाळीला देवी लक्ष्मीला कच्चे चने अर्पण करा आणि नंतर पिंपळाच्या झाडाखाली ते ठेवा. असे केल्याने देवी लक्ष्मी (Diwali 2022) प्रसन्न होते.


वाचा : अंदाधुंद गोळीबारात महापौरांसह 18 जणांचा जागीच मृत्यू; पाहा Video  


- दिवाळीच्या रात्री लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच काळ्या हळदीची पूजा करून ती घर-ऑफिसच्या तिजोरीत ठेवावी. असे केल्याने माँ लक्ष्मी प्रसन्न होते आणि धनप्राप्ती होऊ लागते.


- दिवाळीच्या दिवशी चांदी, तांब्या किंवा स्टीलच्या भांड्यात पाणी भरून घराच्या ईशान्य दिशेला ठेवा. मात्र हे करताना घरातीस तिजोरीचे तोंड उत्तर दिशेला असले पाहिजे. तसेच तिजोरीमध्ये पैसे आणि दागिने लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवावे.असे केल्याने आर्थिक विवंचनेतून सुटका होईल. 


 


 


 


 


(Disclaimer:  येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)