Diwali Bhaubeej 2022: दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावेळी दिवाळी 22 ऑक्टोबरपासून सुरु होत असून 26 ऑक्टोबरला संपणार आहे. दीपोत्सव (Dipotsav 2022) धनत्रयोदशीपासून सुरु होतो आणि  भाऊबीज या दिवशी संपते. बहीण भावाच्या नात्यातील गोडवा, नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. हिंदू धर्मात भाऊबीज (Bhaubij 2022) सणाला विशेष महत्त्व आहे.  रक्षाबंधन सणाप्रमाणेच भाऊबीज हा सण भाऊ-बहिणीचं नातं दृढ करतं. भाऊबीज हा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला साजरा केला जातो. यावर्षी भाऊबीज सण 27 ऑक्टोबर 2022 रोजी येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाची द्वितीया तिथी 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजून 42 मिनिटांनी सुरू होत आहे. द्वितीया तिथी 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:45 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 27 ऑक्टोबरला भाऊबीज साजरी होणार आहे. या दिवशी भावाला औक्षण करण्याचा शुभ मुहूर्त दुपारी 12 वाजून 14 मिनिटांपासून ते 12 वाजून 47 मिनिटांपर्यंत असणार आहे.


Guru Margi 2022: दिवाळीनंतर गुरू ग्रह होणार मार्गस्थ, या राशींना मिळणार नशिबाची साथ


भाऊबीजेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. यानंतर भावासाठी पूजेचं ताट तयार करावं. ताटात रोळी, चंदन, अक्षता, धूप-दीप, मिठाई ठेवा. शुभ मुहूर्तावर दिवा लावून भावाची आरती करावी. त्यानंतर कपाळावर चंदनाचा तिलक लावावा. तिलक लावताना "भ्रातस्तवानुजाताहं भुंक्ष्व भक्तमिमं शुभं, प्रीतये यमराजस्य यमुनाया विशेषत:" या मंत्राचा जप करा.