Guru Grah Margi On 24 November 2022: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी बदल करतो. या गोचराचा प्रभाव सर्व 12 राशींच्या जीवनावर दिसून येतो. सध्या देवगुरू बृहस्पति वक्री अवस्थेत असून 24 नोव्हेंबरला मीन राशीत मार्गस्थ होणार आहेत. 29 जुलैपासून गुरू ग्रह मीन राशीत वक्री अवस्थेत आहे आणि 24 नोव्हेंबरपासून मार्गी होईल. जेव्हा जेव्हा एखादा ग्रह त्याची स्थिती बदलतो तेव्हा त्याचा प्रत्येकाच्या राशीवर परिणाम होतो. मीन गुरू ग्रह मार्गी होताच पंच महापुरूष राज योग तयार होणार आहे. या बदलाचे फायदे काही राशींवर दिसून येतील. या योगाने काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसून येईल. चला जाणून घेऊयात गुरु ग्रह मार्गस्थ होताच कोणती रास भाग्यवान ठरेल.
मेष - ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या नवव्या आणि बाराव्या घराचा स्वामी गुरु आहे. अशा परिस्थितीत या राशींसाठी गुरू मार्गस्थ होताच फलदायी ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांची या कालावधीत बदली होऊ शकते. एवढेच नाही तर या काळात उत्पन्नाचे नवे स्रोत उघडतील.
मिथुन - या राशीचा 8व्या आणि 11व्या घराचा स्वामी गुरू आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना विशेष लाभ होणार आहे. नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल आहे. या काळात रखडलेल्या कामांना गती मिळेल. अडकलेले पैसे परत मिळतील. एवढेच नाही तर कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल.
कर्क - ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रह मार्गस्थ होता या राशीच्या लोकांच्या जीवनातील अडथळे दूर होतील. या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही ज्या क्षेत्रात हात घालाल तिथे तुम्हाला यश मिळेल. कुटुंबातील कलह दूर होतील आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील.
Shani Sadesati: वर्ष 2023 मध्ये 'या' तीन राशी शनिच्या प्रभावातून होणार मुक्त, जाणून घ्या
कन्या - या राशीच्या चौथ्या आणि सातव्या घराचा स्वामी गुरू आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना पैशाचे नवे स्रोत निर्माण होतील. व्यवसायात तुम्हाला मोठे यश मिळेल. तसेच पगारदार लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
(Disclaimer: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)