Narak Chaturdashi Diwali 2022:  सध्या सगळीकडे दिवाळीची धामधूम सुरु आहे  घराघरात दिवाळीचा फराळ आणि दिवाळी ची सजावट झाली असेल. हा दिवाळी सण जरा स्पेशल आहे कारण आज च इंडिया आणि पाकिस्तान क्रिकेट सामना होणार आहे संपूर्ण जागाच लक्ष याकडे लागल आहे. भारतीयांसाठी दिवाळीत तर पर्वणीच आहे. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे (diwali 2022) . यावर्षी नरक चतुर्दशी (narak chaturdashi) आणि दिवाळी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

(diwali) एकाच दिवशी आले आहेत. दिवाळी सणात नरक चतुर्दशीला विशेष महत्व आहे. या सणाशी संबंधित हिंदू धर्मग्रंथांमध्ये (hindu mythology diwali story) अनेक श्रद्धा आहेत. या दिवशी भगवान विष्णूचा (lord vishnu and narak chaturdashi) अवतार असलेल्या श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्याच्या बंदिवासातून 16000 स्त्रियांची सुटका केली, असे सांगितले जाते.


या दिवसाला रूप चौदस (roop choudas), काली चौदस (kali choudas) आणि छोटी दिवाळी असेही म्हणतात. नरक चतुर्दशी च्या दिवशी काही काम  मानलं जात. ज्याचा आपल्याला आणि परिवाराला खूप फायदा होतो. चला जाणून घेऊया, (Diwali 2022:narak chaturdashi 2022 do these upay on chhoti Diwali 2022 maa laxmi will fullfill your wishes)


कोणती काम केल्यास या दिवाळीला घरात  होईल भरभराट 
श्रीकृष्णाची पूजा करा
या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करणे अत्यंत शुभदायक मानले जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्री कृष्णाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि भगवान श्रीकृष्ण सदैव आपल्या पाठीशी  राहतात. 
.
14 दिवे लावणे शुभ 
नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असेही म्हणतात. सूर्यास्तानंतर घराच्या दारावर 14 दिवे लावणे शुभ असते. ध्यानात ठेवा दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावावा. असे केल्याने कुटुंबातील सर्व समस्या संपतात.


यमासाठी दिसू प्रज्वलित करणे 
नरक चतुर्दशीला यमदेवाच्या नावाने दिवा लावणे शुभ असते.  या दिवशी यमासाठी दिवा लावल्याने कुटुंबातील कोणाचाही अकाली मृत्यू होत नाही, अशी श्रद्धा आहे.


कालिका देवीची पूजा 
नरक चतुर्दशीच्या दिवशी कालिका मातेची पूजा करणे खूप शुभ आहे. या दिवसाला काली चौदस असेही म्हणतात. कालिका देवीची पूजा केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, असे म्हटले जाते.


उटणं लावणे शुभ 
नरक चतुर्दशीला उटणं लावणे खूप शुभ मानले जाते. या दिवसाला रूप चौदास असेही म्हणतात. सकाळी लवकर उठून चेहऱ्यावर उटणं लावणे आणि पाण्यात कडुलिंबाची पाने टाकून आंघोळ करणे खूप फायदेशीर आहे.
चला तर मग या नरक चतुर्दशीला वरील उपाय करून नक्की पाहा. 
(वरील माहिती सर्वसामान्य ,माहितीच्या आधारावर आहे zee २४taas याची खातरजमा करत नाही.)