नवी दिल्ली : प्रकाशाचं पर्व म्हणून ओळखल्या जाणा-या दीपावलीचा उत्सव राजधानी दिल्लीतही मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच निमित्तानं राष्ट्रपती भवन विविधरंगी प्रकाशानं उजळून निघाले. सूर्य अस्ताला गेल्यानंतर राष्ट्रपती भवनाच्या विस्तीर्ण वास्तूवर उलगडलेला प्रकाशरंगांचा पट, सर्वांचंच लक्ष वेधून घेत होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


गडद होत जाणाऱ्या अंधाराबरोबर, हा प्रकाशरंग अधिकच उजळून निघाला.