Diwali 2022: दिवाळीत लक्ष्मीसमोर सात ज्योतींचा दिवा लावणे खूप भाग्यशाली, घरात कधीच येत नाही गरिबी
Diwali 2022 Upay: हिंदू धर्मात, दिवाळी हा सण कार्तिक महिन्याच्या अमावास्येला साजरा केला जातो. दिवाळी हा पाच दिवसांचा सण आहे. या दिवशी लक्ष्मीची पूजा करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतल्यास लक्ष्मी देवीची कृपा कायम राहते. (Diwali Puja Tips)
Diwali and Maa Lakshmi Puja Tips: सनातन धर्मानुसार, पाच दिवसांची दिवाळी धनत्रयोदशीच्या दिवशी सुरु होते. आणि भाई दूजच्या दिवशी दिवाळी संपते. दिवाळीच्या दिवशी गणपती आणि लक्ष्मीची पूजा (Lakshmi Puja) करण्याची परंपरा शतकानुशतके जुनी आहे. अशा स्थितीत लक्ष्मीच्या घरी आनंदी स्वागत करण्यासाठी अनेक प्रकारची तयारी केली जाते. घरे स्वच्छ केली जातात, खराब असलेल्या मोठ्या वस्तू घराबाहेर फेकल्या जातात. पण देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पूजेच्या वेळी काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार नरक चतुर्दशीचा सणही दिवाळीच्या (Diwali) दिवशी साजरा केला जातो. पंचांगानुसार यावेळी 24 ऑक्टोबरला दिवाळी साजरी होणार आहे. जाणून घ्या दिवाळीत या दिवशी घरामध्ये लक्ष्मीची पूजा कशी केली जाते आणि कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
दिवाळीत घरी लक्ष्मीपूजन कसे करावे (Diwali 2022 lakshmi Pujan Vidhi)
- दिवाळीची पूजा करताना चोघड्याचा मुहूर्त नेहमी लक्षात ठेवा. असे मानले जाते की या मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा (Lakshmi Puja) केल्यास देवी प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात.
- दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीसोबतच श्रीगणेश, भगवान कुबेर, माँ सरस्वती यांचीही पूजा केल्याने शुभ फळ मिळते.
- या दिवशी माता लक्ष्मीसमोर सातमुखी दिवा लावल्याने महालक्ष्मीची कृपा सदैव राहते आणि व्यक्तीला जीवनात कशाचीही कमतरता भासत नाही.
- ज्योतिषशास्त्रानुसार दिवाळीच्या पूजेच्या वेळी कलशाची स्थापना करणे आवश्यक आहे. या तांब्याच्या किंवा पितळेच्या कलशाच्या वरच्या भागावर कलव बांधावा. पाणी भरुन आंब्याची पाने ठेवा.
- दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी दारात पूजा अवश्य करावी, असे मानले जाते की, घराच्या मुख्य दरवाजातून मां लक्ष्मी घरात प्रवेश करते. अशा वेळी घराचा मुख्य दरवाजा चांगला सजवा. आणि तिथल्या स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या.
- लक्ष्मी-गणेशाची पूजा करताना विशेष काळजी घ्या की पूजा करताना तोंड उत्तरेकडे असावे किंवा ईशान्य दिशेलाही करु शकता.
- महालक्ष्मीसोबतच कुबेर देवाच्या यंत्राची योग्य दिशेने स्थापना केल्याने विशेष धनलाभही होतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)