अशा लोकांशी प्रेमाने वागा; अन्यथा, तुमच्यावर लक्ष्मी होईल नाराज!
म्ही जर तुमच्या वर्तनामुळे काही लोकांना अपमानीत किंवा दु:खी करत असाल तर, लक्ष्मी तुमच्यावर नाराज होते. जाणून घ्या कोण आहेत त्या व्यक्ती?
मुंबई : चागले वर्तन, चांगली सुरूवात आणि चांगले विचार हे कोणतेही काम तडीस नेण्यासाठी महत्तवाचे ठरतात. त्यातून होणारा फायदाही तसाच असतो. विशेषत: या गुणांमुळे लक्ष्मी प्रसन्न होते. त्यामुळे आर्थीक भरभराट होते असे म्हणतात. पण, शास्त्र असे सांगते की, तुम्ही जर तुमच्या वर्तनामुळे काही लोकांना अपमानीत किंवा दु:खी करत असाल तर, लक्ष्मी तुमच्यावर नाराज होते. जाणून घ्या कोण आहेत त्या व्यक्ती?
गुरूवर्य
अडचणीतून मार्ग दाखवण्यासाठी गुरूच कारणभूत ठरतो. योग्य गुरूचे मार्गदर्शन म्हणजे जणू इश्वराचीच प्राप्ती. अशा गुरूला कधीच अपमानीत करू नका. लक्ष्मी वरदान देईल.
आई-वडील
गुरू मार्ग दाखवतो. पण, त्यासाठी आगोदर आपण जन्माला तर यावे लागते. सृष्टीत ही देणगी केवळ आई-वडीलच देतात. म्हणून आई-वडीलांना कधी अपमानीत करू नका. लक्ष्मी प्रसन्न होईल.
ज्येष्ठ नागरिक
ज्या ठिकाणी ज्येष्ठांचा सन्मान होत नाही. तेथे लक्ष्मी थांबत नससे. म्हणून ज्येष्ठांचा अपमान करू नका.
महिलांचा सन्मान
ज्या घरात महिलांचा सन्मान राखला जातो त्या ठिकाणी लक्ष्मीचा निवास असतो. त्यामुले केवळ घरातीलच नव्हे तर, समस्त महिलांचा सन्मान करा.