मुंबई : घरातली सर्वात महत्त्वाची जागा म्हणजे स्वयंपाक घर. स्वयंपाक घरात सर्वांसाठी जेवण तयार होतं. ज्यामुळे प्रत्येकाच्या जीवनाचं चक्र सुरू असतं. पण काही अशा गोष्टी आहेत, ज्या घरात ठेवल्यामुळे अशुभ संकेत मिळतात. स्वयंपाकघरातील वास्तूमध्ये केलेल्या चुकीमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्याचा वाईट परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावा लागतो. अशी परिस्थिती टाळण्यासाठी वास्तुशास्त्रात काही वस्तू स्वयंपाकघरात ठेवण्यास सक्त मनाई आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- तुटलेली किंवा तडे गेलेली भांडी कधीही वापरू नका किंवा स्वयंपाकघरात ठेवू नका. असे करणे म्हणजे विनाशालाच आमंत्रण देणं आहे. तुटलेल्या भांड्यांमुळे आर्थिक संकट निर्माण होतं.


- अनेक लोक औषधे, बँडेज किंवा ट्यूब इत्यादी स्वयंपाकघरात ठेवतात, जेणेकरून भाजल्यास आणि कापल्यास त्वरित जखमेवर लावता येईल. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून फर्स्‍ट एड किट घरात असणं महत्त्वाचं आहे, परंतु ते स्वयंपाकघरात ठेवण्याची चूक करू नका. वास्तूनुसार स्वयंपाकघरात औषधं ठेवल्याने घरातील प्रमुख व्यक्ती आजारी राहतो. त्याचबरोबर इतर सदस्यांनाही काही आजार होतात.


- योग्य ठिकाणी आरसा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, परंतु स्वयंपाकघरात आरशाचा वापर केल्यास घराचा नाश होऊ शकतो. त्यामुळे स्वयंपाकघरात कधीही आरसा लावू नका. त्यामुळे वाद वाढतात. 


- अनेकदा उरलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी वापरलं जातं. वास्तुशास्त्रात याला खूप अशुभ सांगितलं जातं. यासोबतचं वैद्यकीय शास्त्रामध्ये कर्करोगाचा धोकाही सांगितला आहे. मळलेले पीठ रात्रभर ठेवल्याने घरात शनि आणि राहूचा नकारात्मक प्रभाव पडतो.