मुंबई : घर हे प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न असते. त्यामुळे बहुतांश लोक हे आपल्या आयुष्यातील एकूण पूंजीपैकी बराचसा पैसा घर खरेदी करण्यासाठी गुंतवतात. अर्थात घर घेताना, मग ते भाडेतत्त्वावर असो किंवा खेरदी केलेले काही गोष्टींचा विचार होणे अत्यंत महत्त्वाचे असते. घर घेताना जर ठिकाण चुकले तर तुमच्या प्रगतिमधील बरेच मार्गही चुकण्याची शक्यता असते. अनेकदा हे प्रकरण तुमचे दिवाळे वाजण्यापर्यंत जाते. म्हणूनच कोणत्या ठिकाणी घर घेऊ नये, यासाठी वाचा या टीप्स..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जीवन सन्मान - ज्या ठिकाणी तुम्हाला सन्मान नसतो, तुमचे मित्र, नातेवाईक नसतात शिक्षणाचा अभाव असतो, भविष्यातही तिथे फारसा विकास संभावत नाही, अशा ठिकाणी कमी किंमतीत मिळत असले तरीही घर मुळीच घेऊ नये. 


नोकरी/व्यवसाय - ज्या ठिकाणी नोकरी किंवा व्यवसाय करण्यास फारशी संधी उपलब्ध नाही, अशा ठिकाणी जागा कितीही सुंदर असली तरी घर घेऊ नका. 


नागरी सुविधा - ज्या ठिकाणी लोकांना शिक्षणाचे महत्त्व कळलेले नसते. तिथे शाळा, कॉलेज, वाचनालये, आरोग्य सुविधा, दळणवळणाच्या सोई आणि साधने यांचा अभाव असतो, असेही ठिकाण घर घेताना टाळाच.


सुरक्षा - ज्या ठिकाणी नागरी आणि मानवी सुरक्षेची काहीच खात्र नसते. पोलिसी सुरक्षाही योग्य अंतरावर नसते अशा ठिकाणीही घर घेणे टाळा.


वर सांगितेले पर्याय नक्की ध्यानात घ्या. कारण, अशा ठिकाणी घर घेतल्यास तुम्हाला काहीच फायदा संभवत नाही. त्यामुळे कितीही स्वस्त दरात घर घेतले तरी, ते तुमचे दिवाळे वाजविण्याचीच शक्यता अधिक.