मुंबई : आज अक्षय तृतीया आहे. यामुळे बाजार फुललेली आहेत. लोकं खरेदी करत आहेत. आपल्या अराध्य देवतेची पूजा करत आहेत. अक्षय तृतीयाला यंदा शुभ मुहूर्त आहे. अनेक वर्षानंतर असा योग येतो. अक्षय तृतीयाची सुरुवात पहाटे 3.45 पासून सुरु झाली आहे. रात्री 1.45 वाजता ती संपल. अशी मान्यता आहे की, कृतिका नक्षत्राच्या प्रथम चरणामध्ये मेष राशीमध्ये सूर्य असल्याने सतयुगाचा प्रारंभ झाला. पुराणानुसार त्रेता युगाचा प्रारंभ देखील याच दिवशी झाला. याच दिवशी बद्रीनाथ धाम येथे नर-नारायणाचा अवतार झाला. आज सूर्योदयाच्या वेळी सूर्य मेष राशीमध्ये असतो. कृतिका नक्षत्राच्या प्रथम चरणात सूर्य येतो. असा योग शेकडो वर्षानंतर येतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कृतिका नक्षत्राच्या प्रथम चरणात सूर्य मेष राशीमध्ये आल्याने चांगला योग बनत आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी पिंडाच्या विना देखील श्राद्ध करण्याचं विधान आहे. गंगा आणि तीर्थ स्नानाचं विशेष महत्व आहे. यासाठी पाण्याने भरलेला कळस, पंखा, चप्पल, भूमी आणि गोदानचं महत्त्व आहे.


अक्षय तृतीयाला गंगा स्नान पुण्याचं मानलं जातं. ज्याच्या कुंडलीमध्ये पितर दोष आहे त्यांनी पिंडदान, तर्पण करावे. अक्षय तृतीयाला सोनं खरेदी, जमीन खरेदी, गृह प्रवेश, नव्या व्यापाराची सुरुवात, तीर्थयात्रा शुभ मानलं जातं.