देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारी करा असा उपाय, आर्थिक कोंडी सुटणार
Friday Totke: आर्थिक संकटात आपल्याला काहीच सुचत नाही. कारण पैशांची चणचण आणि मदतीचा अपेक्षा हे न सुटणारं गणित आहे. अगदी मोक्याच्या वेळी जवळचे नातेवाईकही साथ देत नाही. त्यामुळे आर्थिक संकट लवकरात लवकर सुटावं अशी मनोमन प्रार्थना करत असतो. हिंदू धर्मात देवी लक्ष्मीची कृपा असल्यास पैशांची उणीव भासत नाही, असं बोललं जातं.
Friday Totke: आर्थिक संकटात आपल्याला काहीच सुचत नाही. कारण पैशांची चणचण आणि मदतीचा अपेक्षा हे न सुटणारं गणित आहे. अगदी मोक्याच्या वेळी जवळचे नातेवाईकही साथ देत नाही. त्यामुळे आर्थिक संकट लवकरात लवकर सुटावं अशी मनोमन प्रार्थना करत असतो. हिंदू धर्मात देवी लक्ष्मीची कृपा असल्यास पैशांची उणीव भासत नाही, असं बोललं जातं. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक वार कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे. शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित वार आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा केल्यास विशेष कृपा मिळते. ज्योतिषशास्त्रात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही तोडगे देण्यात आले आहेत. हा उपाय शुक्रवारी रात्री गुप्तपणे करावा. हा तोडगा लाभदायी सिद्ध होऊ शकतो.
शुक्रवारी रात्री हा तोडगा करा
-शुक्रवारी रात्री लक्ष्मीच्या अष्टस्वरुपाची पूजा करणं शुभ मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर अगरबत्ती लावा. त्यानंतर गुलाबाचं फूल अर्पण करावं. देवी अष्टलक्ष्मीला लाल फुलांची माळ अर्पण करणं शुभ मानलं जातं.
-आर्थिक कोंडीत अडकला असाल तर शुक्रवारी रात्री ‘ऐं ह्रीं श्रीं अष्टलक्ष्मीयै ह्रीं सिद्धये मम गृहे आगच्छागच्छ नम: स्वाहा’ या मंत्राचा जप करावा. एक माळ म्हणजेच 108 वेळा या मंत्राचा जप करावा. यामुळे जीवनातील आर्थिक संकट दूर होतं.
-शुक्रवारी रात्री गुलाबी रंगाचा कपडा घेऊन त्यात श्रीयंत्र आणि अष्टलक्ष्मीचा फोटो ठेवावा. हा उपाय गुप्तपणे केल्यास व्यवसायातील अडचणी दूर होतात. व्यक्तीची प्रगती होते.
बातमी वाचा- Budh Vakri: बुध ग्रहाच्या वक्री स्थितीमुळे मिळणार पाठबळ, या तारखेपासून राशींचं नशीब उजळणार
-देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी भगवान विष्णुंची पूजा करणं आवश्यक आहे. शुक्रवारी रात्री दक्षिणावर्ती शंखात पाणी घ्या आणि भगवान विष्णुचा अभिषेक करा. यामुळे आर्थिक संकट सुटेल.
-ज्योतिषशास्त्रानुसार अष्ट गंधाने श्री यंत्र आणि अष्टलक्ष्मीला टिळा लावावा. यामुळे जीवनातील अडचणी दूर होण्यास मदत होते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)