Mahashivratri 2023  Kaal Sarp Dosh : कुंडलीत कालसर्प दोष असणाऱ्यांसाठी यंदाची महाशिवरात्र अत्यंत लाभदायी ठरणार आहे. महाशिवरात्रीला (Mahashivratri 2023) काही सोपे उपाय केल्यास कुंडलीतील कालसर्प दोष (Kaal Sarp Dosh) दूर होऊ शकतो. या दिवशी सर्व शिवभक्तांनी शिवाची आराधना व पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी मनोभावे पूजा करणाऱ्यांना इछ्चित गोष्ट साध्य होतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा महाशिवरात्री 18 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह सोहळा फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. (Mahashivratri 2023 ) याच दिवशी होणारी त्यांची भेट म्हणजे महाशिवरात्री होय.


शिवलिंगाची उत्पत्ती महाशिवरात्रीच्या दिवशीच झाली होती असा दावा अनेक हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणामध्ये करण्यात आला आहे. महाशिवरात्रीला शिवमंदिरात शिवलिंगाचा जलाभिषेक, रुद्राभिषेक, बेलपत्र, गंगाजल, भांग-धतुरा यासह शिवाच्या मंत्रांचा जप केला जातो. महाशिवरात्रीला शिवाची आराधना आणि मंत्रजप केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दु:खांचा अभाव आणि कुंडलीतील सर्व प्रकारचे दोष दूर होतात.


यंदाची महाशिवरात्री अतिशय विशेष मानली जात आहे. ज्योतिष शास्त्रानुसार 30 वर्षांनंतर महाशिवरात्रीला दुर्मिळ योग घडत आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शनी आणि सूर्य दोघेही कुंभ राशीत प्रेवश करत आहेत. या दोघांच्या गोचरमुळे शुभ प्रभाव अनेक राशींवर दिसून येईल.  


पंचांग गणनेनुसार यावेळी महाशिवरात्रीच्या दिवशी शनि प्रदोष आणि सर्वार्थसिद्ध योगाचा शुभ संयोगही तयार होत आहे. यामुळेच यंदाची महाशिवरात्र शंकराची पूजा आणि ज्योतिषीय उपायांसाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. कुंडलीत कालसर्प दोष असल्यास महाशिवरात्रीला काही खात्रीशीर उपाय केल्यास दूर होवू शकतो. 


कालसर्पदोष म्हणजे काय?


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू आणि केतू यांच्यामध्ये इतर कोणताही ग्रह येतो तेव्हा त्याला कालसर्प दोष म्हणतात. हा कालसर्प दोष अत्यंत अशुभ मानला जातो. कुंडलीत कालसर्प दोष असल्यास लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. छोट्या-छोट्या गोष्टींचा विचार करायला त्रास होऊ लागतो. मनात नेहमीच भीती असते. याशिवाय कालसर्प दोषामुळे व्यक्तीच्या वैवाहिक जीवनातही अनेक समस्या येतात.


महाशिवरात्रीला भगवान शंकराची पूजा केल्याने कालसर्प दोष दूर होतो


कुंडलीत कालसर्प दोष असणाऱ्यांनी महाशिवरात्र अत्यंत महत्वाची आहे. कालसर्पदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी महाशिवरात्रीला भगवान शंकराची पूजा करणे खूप शुभ आहे. कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी उज्जैनच्या महाकालेश्वर, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आणि प्रयागराज येथील तक्षकेश्वर महादेवाची पूजा, आराधना आणि रुद्राभिषेक केल्यास कुंडलीतील कर्सर्प दोषाचा प्रभाव कमी होतो किंवा नाहीसा होतो. महाशिवरात्रीला कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी महामृत्युंजय मंत्र, रुद्राभिषेक आणि चांदीच्या नागाची जोडी शिवाला अर्पण करावी.