Palmistry: तुमच्या हातावर ‘या’ रेषा आहेत? तर लवकरच तुम्हीही व्हाल श्रीमंत
आपल्या हातातील अशा काही रेषा आहेत, ज्या आपल्याला भविष्यात कधी आणि किती पैसे मिळतील हे सूचित करतात.
मुंबई : जीवनात संपत्ती मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने मेहनत घेतो, पण प्रत्येकाला हे सुख आणि समृद्धी मिळतेच असं नाही. काही लोकच या बाबतीत भाग्यवान असतात. तुमच्या नशिबात धन-संपत्ती आहे की नाही, हे रहस्य दुसरीकडे कुठे नाही तर तुमच्या तळहातात दडलेलं आहे. हस्तरेषेच्या शास्त्रात हाताच्या रेषांवरून येणाऱ्या काळाची कल्पना येऊ शकते.
आपल्या हातातील अशा काही रेषा आहेत, ज्या आपल्याला भविष्यात कधी आणि किती पैसे मिळतील हे सूचित करतात. असे अनेक लोक असतात ज्यांच्या हातात अचानक कुठूनतरी धन-संपत्ती मिळण्याची शक्यता असते.
असे बनतात लोकं करोडपती
हस्तरेषेनुसार, जर सूर्य रेषेमध्ये दोष नसेल आणि त्या एकापेक्षा अधिक असतील तर तुमच्या आयुष्यात करोडपती होण्याचा योग आहे. जर तुमच्या हातात शनि आणि सूर्याची बोटं सरळ असतील आणि भाग्यरेषा मणिबंधातून बाहेर पडून थेट शनी पर्वतावर पोहोचली असेल तर अशा व्यक्तींना धनवान होण्यास वेळ लागत नाही.
जर तुमच्या तळहातातील भाग्यरेषा जाडपासून पातळ होताना दिसत असेल, शनीचा पर्वत खूप उंच असेल आणि मस्तकाची रेषा मंगळाच्या पर्वताकडे जात असेल तर अशा व्यक्तीला व्यवसायात मोठं यश मिळतं. अशी व्यक्ती नोकरीपेक्षा व्यवसायात अधिक यशस्वी ठरते.
अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे
हस्तरेषा शास्त्रानुसार, जर तुमच्या तळहातातील रेषा चंद्राच्या दिशेने असेल आणि भाग्यरेषा थेट शनीच्या पर्वताच्या खाली संपत असेल तर अचानक कुठूनतरी मोठ्या प्रमाणात पैसे मिळण्याची शक्यता आहे. अचानक करोडपती होणं अशा लोकांच्या नशिबात लिहिलेलं असतं.
(यामध्ये दिलेली माहिती खरी आणि अचूक आहे असा दावा आम्ही करत नाही. ही माहिती धार्मिक श्रद्धा आणि धर्मनिरपेक्ष श्रद्धेवर आधारित आहे.)