Vehicle Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक वस्तूंवर ग्रहांचा प्रभाव दिसून येतो. काही गोष्टी ग्रहांना अनुकूल असतात. तर काही गोष्टी ग्रहांच्या परिणामुळे प्रतिकूल परिणाम देतात. त्यानुसार प्रत्येक वस्तूंचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो. काही गोष्टी शनिदेवांशी निगडीत असतात. यात लोखंड, काळा रंग, तेल या वस्तू शनिदेवांशी संबंधित आहेत. ज्योतिषशास्त्रात गाडीचा संबंध शनिदेवांशी आहे. कारण गाडी लोखंडापासून बनवलेली असते आणि तेल म्हणजेच पेट्रोल-डिझेलचा वापर होतो. कार किंवा बाईक घेताना फीचर्स, सुविधा, बजेट याशिवाय त्यात किती स्टोरेज स्पेस आहे हेही बघितलं जातं. चारचाकी आणि दुचाकी दोन्हीमध्ये डिक्कीचा आकार मोठा असावा अशी लोकांची अपेक्षा असते. जेणेकरून अधिकाधिक सामान ठेवता येईल. परंतु वाहनाच्या डिक्कीत अनेक अनावश्यक गोष्टी ठेवल्याने शनिदेवाचा त्रास होऊ शकतो. चला जाणून घेऊयात कोणत्या चुकांमुळे शनिदेवांची अवकृपा होते. तसेच जीवनात मोठं संकट होऊ शकतं. 


गाडीच्या डिक्कीत या वस्तू ठेवू नका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिष शास्त्रानुसार कारमध्ये स्टेपनी, टूल किट यासारख्या आवश्यक गोष्टी ठेवणे ठीक आहे. पण जुनी बिले, टाकाऊ कागद किंवा इतर गोष्टी ठेवू नका. अनावश्यक गोष्टी डिक्कीत ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे डिक्की वेळोवेळी स्वच्छ करत राहा आणि नकारात्मक ऊर्जा दूर करा.


शनिचा अशुभ प्रभाव


वाहनात शनिशी संबंधित दोष असल्यास वाहन पुन्हा-पुन्हा बिघडते. सोबतच अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी वाहनाची डिक्की साफ करणं आवश्यक आहे. गाडी वेळोवेळी सर्व्हिसिंग करत राहा. कोणतेही चुकीचं काम करू नका, तसेच नियम मोडू नका. नियम मोडणाऱ्या लोकांवर शनि लवकर नाराज होतात.


बातमी वाचा- Kalashtami 2022: कालाष्टमीला हे उपाय करून मिळवा कालभैरवाची कृपा, जाणून घ्या पूजा विधी आणि मुहूर्त


वाहन समस्यानिवारण


जर कारशी संबंधित कोणतीही समस्या वारंवार येत असेल तर याचा अर्थ असा होतो की शनिदेव नाराज आहेत. यासाठी प्रत्येक शनिवारी शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करावे. गरीब आणि असहाय्य लोकांना मदत करा.  यामुळे शनिशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)