Dream Interpretation Hair Cut: आपल्याला स्वप्नात ज्या गोष्टी दिसतात, जे काही प्रसंग घडतात त्याचा काही ना काही सांकेतिक अर्थ असतो असं स्वप्न शास्त्र सांगतं. स्वप्नांच्या माध्यमातून आपल्याला भविष्यासंदर्भातील संकेत मिळतात असं सांगितलं जातं. तशी आपल्याला अनेक प्रकारची स्वप्नं पडतात. काही स्वप्न चांगली तर काही फारच वाईट असतात. अनेक स्वप्न कधीच पुन्हा पडू नयेत असं वाटतं. मात्र स्वप्नांवर आपलं नियंत्रण नसतं. कधी तरी स्वप्नामध्ये स्वत:च्या हाताने स्वत:चे केस कापताना काही जणांना दिसतं तर काहींनी पाढंरे केस दिसतात. कधीतरी आपण कधीच न केलेली हेअरस्टाइलमध्येच आपण स्वप्नात स्वत:ला पाहतो. मात्र या स्वप्नांचा नेमका अर्थ काय असतो तुम्हाला माहितीये का? याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत. या क्षेत्रातील जाणकार अशा स्वप्नांबद्दल काय सांगतात पाहूयात...


कोणीतरी केस कापताना दिसल्यास...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वप्न शास्त्रानुसार जर तुम्हाला स्वप्नात कोणीतरी तुमचे केस कापत असल्याचं दिसलं तर हा शुभ संकेत मानला जातो. तुमच्या डोक्यावर काही कर्ज असेल तर लवकरच ते संपणार असल्याचे संकेत या अशा स्वप्नांमधून मिळतात असं स्वप्न शास्त्र सांगतं.


स्वत:ला स्वत:चे केस कापताना पाहणं


स्वप्नामध्ये आपण स्वत: आपले केस कापत असल्याचं दिसलं तर तुम्हाला कोणती तरी समस्या सतावत असून तुम्ही त्या समस्येचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचा हा सांकेतिक इशारा असतो. लवकरच तुम्ही या समस्येवर उपाय शोधाल असा या स्वप्नाचा अर्थ लावला जातो.


हेअरस्टाइल बदलणं


जर तुम्हाला स्वप्नामध्ये तुमच्या केसांची रचना म्हणजेच हेअरस्टाइल बदलल्याचं दिसलं तर त्याचाही सांकेतिक अर्थ असतो. तुम्ही कधीच न केलेल्या हेअरस्टाइलमध्ये स्वत:ला स्वप्नात पाहिलं असेल तर तुम्ही फारच सकारात्मक आहात. तुम्ही फार मेहनत घेऊन काम करत आहात. या कामाचं चांगलं फळ तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये मिळणार असल्याचे हे संकेत असतात.


पांढरे केस दिसणं


स्वप्नात सफेद केस दिसण्याचा अर्थ तुम्ही केलेल्या कामांचे सकारात्मक परिणाम तुम्हाला भविष्यात पाहायला मिळतील असा होतो. समाजाकडून तुम्हाला मान-सन्मान मिळेल आणि तुमची प्रतिष्ठाही वाढेल असा या स्वप्नाला अर्थ असतो.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)