SA vs AFG: आफ्रिकेविरूद्ध झालेल्या पराभवानंतर राशिद खानला अश्रू अनावर, सामन्यानंतर केलं असं की...!

T20 वर्ल्डकप 2024 मधील अफगाणिस्तानचा प्रवास संपला आहे. सुपर 8 मध्ये ऑस्ट्रेलियासारख्या टीमला पराभूत करून सेमीफायनल गाठलेल्या अफगाणिस्तान टीमला दक्षिण आफ्रिकेला टक्कर देता आली नाही. T20 वर्ल्डकपच्या इतिहासातील एकतर्फी सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने 9 विकेट्स राखून विजय मिळवला. या पराभवाने अफगाणिस्तानच्या खेळाडूंसोबतच चाहत्यांचीही मनं तुटली.

| Jun 27, 2024, 19:00 PM IST
1/7

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवामुळे अफगाणिस्तानचे खेळाडू भावूक झाले. 

2/7

सेमीफायनल संपल्यानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंचे चेहरे पूर्णपणे पडले होते. राशीद खानला हा पराभव पचवणं कठीण झालं होतं. 

3/7

अफगाणिस्तानची टीम सामना जिंकल्यानंतर मैदानात फेरी मारते. यावेळी सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यानंतरही अफगाणिस्तानचे खेळाडू मैदानात फिरले होते.   

4/7

यावेळी टीमला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियमवर पोहोचलेल्या चाहत्यांचे त्याने आभार मानले.

5/7

अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीमचा डाव अवघ्या 56 रन्सवर आटोपला. 

6/7

टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये अफगाणिस्तानचा चांगला खेळ झाला होता. पहिल्यांदा न्यूझीलंड आणि सुपर 8 मध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.

7/7

2009 मध्ये अफगाणिस्तानने पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं होतं. यावेळी टीमचं टी20 पदार्पण 2010 मध्ये झालं होतं. अवघ्या 15 वर्षात संघाने T20 वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरी गाठली.