Mangal Transit In Tula: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो. ग्रहांच्या या गोचरचा परिणाम मानवी जीवनावर होताना दिसतो. अनेकदा यामुळे काही राशींना चांगले, तर काही राशींना वाईट परिणामांना सामोरं जावं लागतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी काळामध्ये मंगळ ग्रह गोचर करणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला मंगळ तूळ राशीत प्रवेश करणार आहे. मंगळाच्या या गोचरचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. मात्र यावेळी 3 राशी अशा आहेत ज्यांना या गोचरचा फायदा मिळणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत, ज्यांना मंगळाच्या गोचरमुळे सकारात्मक परिणाम मिळणार आहेत.


मेष रास (Aries Zodiac)


मेष राशीच्या लोकांसाठी मंगळाचं गोचर शुभ ठरणार आहे. या काळात विवाहितांच्या जीवनात यावेळी गोडवा वाढणार आहे. तुमच्या जोडीदाराकडूनही पूर्ण सहकार्य मिळेल. नशीब तुम्हाला पूर्णपणे साथ देईल. धार्मिक कार्यातही तुमची आवड वाढेल. ज्या कामाचा तुम्ही खूप दिवसांपासून विचार करत होता ते काम मार्गी लागण्यास मदत होणार आहे. नोकरदार लोकांनाही यश मिळेल. 


वृश्चिक रास (Scorpio Zodiac)


मंगळाच्या राशीतील बदल तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतात. या काळामध्ये तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते. मालमत्ता किंवा कोणतीही जुनी गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला नफा मिळू शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना नवीन संधी मिळतील. तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळणार आहे.


कन्या रास (Kanya Zodiac)


कन्या राशीच्या राशीच्या लोकांसाठी मंगळाचं गोचर आर्थिकदृष्ट्या शुभ ठरणार आहे. या काळात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळतील. त्याचप्रमाणे थकीत पैसेही मिळू शकणार आहेत. करिअरच्या दृष्टीने हा काळ खूप फलदायी असणार आहे. तुम्हाला मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. कायदेशीर वादात अडकलेल्या लोकांना यावेळी दिलासा मिळणार आहे. व्यक्तिमत्वात सुधारणा होईल.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )