Dussehra 2022 : हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी दसरा हा एक महत्त्वाच सण (Significance of Dussehra) आहे. दरवर्षी अश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी दसरा (Why is Dussehra celebrated) अतिशय उत्साहात साजरा केला जातो. यालाच विजयादशमी देखील म्हटले जाते. यंदा दसरा किंवा विजयादशमी 05 ऑक्टोबर 2022 रोजी ( Dussehra 2022 Importance) आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दिवशी रावण दहन आणि शस्त्र पूजा केली जाते. याशिवाय या दिवशी दुर्गा देवी, प्रभू श्रीराम, श्री गणेश यांची देखील पूजा (Dussehra 2022 Shubh Muhurta) करण्याचीही परंपरा आहे. तसेच घरातील हत्यारांचे पूजन केले जाते. यंदा दसऱ्याच्या दिवशी काही खास उपाय केल्यास नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.


- संपत्ती मिळविण्यासाठी, दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी कोणत्याही मंदिरात लक्ष्मीचे (laxsmi temple) ध्यान करताना झाडू दान करा. यामुळे भरपूर संपत्ती आणि समृद्धी मिळते.


- कायदेशीर बाबींमध्ये यश मिळवण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावा. तसेच सुंदरकांडाचे पठण करावे. त्यामुळे संकट दूर होईल.


- नोकरी-व्यवसायात येणारे अडथळे दूर करण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी 'ओम विजयाय नमः' या मंत्राचा जप करा. यानंतर माँ दुर्गेची पूजा करावी. पूजेत देवी आईला 10 फळे अर्पण करा. नंतर ही फळे गरिबांमध्ये वाटा. काही वेळातच अडथळे दूर होऊ लागतील.


वाचा : Electricity Bill येईल अर्ध्यापेक्षा कमी, फक्त ‘हे’ बदल करा 


- दसऱ्याच्या दिवशी नीलकंठ पक्षी नक्की पहा. असे केल्याने जीवनात सुख-समृद्धी तसेच शत्रूंवर विजय प्राप्त होतो. नीलकंठाचे दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते.


दसऱ्याच्या दिवशी पिवळ्या कपड्यात एक नारळ गुंडाळा. त्यानंतर हे नारळ जनेयू आणि मिठाईसह मंदिरात दान करा. यामुळे व्यवसायातील तोटा कमी होतो आणि नफा वाढतो.


 


 


 


 


(Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)