मुंबई :  आर्थिक वृद्धी होणं आणि खर्च करणं कोणाला आवडत नाही. अगदी खाण्यापासून ते शॉपिंगपर्यंत अनेक गोष्टींवर मनोसोक्त खर्च करण्यासाठी मुलींनाच नाही तर 12 राशींपैकी काही राशीच्या लोकांना आवडतं. मुळात हा त्या राशीच्या लोकांचा स्वभाव असतो. कमावलेल्या पैशांमधून खर्च करणं हे त्यांना आवडतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही लोक विचार न करता बेहिशेबी पैसा खर्च करत असतात. ज्योतिष शास्त्रात अशा 5 राशी सांगितल्या आहेत, ज्या पाण्यासारखा पैसा विचार न करता खर्च करतात. माता लक्ष्मी देखील त्यांच्यावर नेहमी प्रसन्न असते. या राशी कोणत्या आहेत जाणून घेऊया.


वृषभ : ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचा स्वामी शुक्र आहे. त्यांना ऐषारामात राहणे आणि भौतिक सुखांचा उपभोग घेणं आवडतं. भरपूर पैसा खर्च केल्यामुळे त्यांच्याकडे फारसा पैसा राहात नाही. जर त्यांना एखादी वस्तू विकत घेण्याचा विचार असेल तरच ते खरेदी करतात. अशा स्थितीत त्यांचे बजेटही कोलमडतं. 


मिथुन : या राशीचे लोकही खूप प्रेमळ असतात. ते त्यांच्या मित्रांवर खूप पैसे खर्च करतात. या राशीच्या लोकांना बचत करता येत नाही. या राशीचा स्वामी बुध ग्रह मानला जातो. म्हणूनच हे लोक आपल्या हुशारीने भरपूर पैसा कमावतात. पण त्यांच्या हातात पैसा उरत नाही. कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसा हातून खर्च होतो. 


सिंह : ज्योतिषशास्त्रानुसार या राशीला सूर्यदेवाची कृपा आहे. त्यांना लक्झरी लाइफस्टाइल आवडतं. हे लोक त्यांच्या सुख-सुविधांवर पाण्यासारखा पैसा खर्च करतात. महागड्या वस्तू खरेदी केल्यामुळे त्यांच्याकडे पैशांची बचत होत नाही.


तुळ : या राशीच्या लोकांकडे संपत्ती आणि पैसा दोन्ही गोष्टी खूप असतात. हे लोक स्वतःपेक्षा इतरांवर जास्त पैसा खर्च करतात. म्हणूनच त्यांच्याकडे बचतीसाठी पैसे उतर नाहीत. हे लोक आजच्या जगण्यावर विश्वास ठेवतात. त्यांना भविष्याची अजिबात चिंता नसते.


कुंभ : या राशीच्या लोकांवर शनीचा प्रभाव दिसतो. या राशीचे लोक समाजात मन ठेवण्यासाठी स्वत:वर आणि इतर गोष्टींवर अमाप पैसा खर्च करतात त्यामुळे त्यांच्या हातात पैसा उरत नाही. त्यांच्याकडे पैसे आले की खर्च होतात. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)