मुंबई : पंचागानुसार आज १७ फेब्रुवारी रोजी फाल्गुन मासाला सुरूवात झाली आहे. फाल्गुन हिंद वर्षातील शेवटचा महिना आहे. या महिन्याला आनंदी आणि उत्साही महिना म्हणून ओळखला जातं. हा फाल्गुन महिना १८ मार्चपर्यंत राहणार आहे. या महिन्यानंतर हळूहळू गर्मीला सुरूवात होते. सोबतच वसंत ऋतुचा प्रभाव असल्यामुळे या महिन्यात प्रेम संबंध आणि नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो. असा असेल फाल्गुन महिना. 


फाल्गुन महिन्यात या गोष्टींची घ्या काळजी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फाल्गुन महिन्यात शीतल किंवा सामान्य पाण्याने आंघोळ करावी. 


जेवणात अन्न-धान्याचा कमी वापर करा, सर्वाधिक फळांचा वापर करा. 


तसेच या महिन्यात सुंदर आणि गडद रंगाचे कपडे घाला. 


दररोज श्रीकृष्णाची पूजा करावी. पूजेत सुंदर फुलांचा वापर करावा. 


या महिन्यात मच्छी, मांस आणि मद्याचे सेवन टाळावे. 


फाल्गुन मासात विशेष उपाय 


तुम्हाला रागावर नियंत्रण मिळवायचे असेल तर संपूर्ण महिन्यात श्रीकृष्णाची आराधना करावी. तसेच गुलाल अर्पण करावे. 


नैराश्याची समस्या असेल तर पाण्यात चंदन घालून स्नान करावी. 


याशिवाय आरोग्याची समस्या असेल तर संपूर्ण महिन्यात भगवान शिवची पूजा करावी. 


तसेच आर्थिक समस्या असेल तर देवी लक्ष्मीची पूजा करावी. हा महिना तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल. 


श्रीकृष्णाची पूजा या काळात महत्वाची 


फाल्गुन महिन्यात श्रीकृष्णाची उपासना विशेष फलदायी असते. या महिन्यात भगवान श्रीकृष्णाच्या बालक, तरुण आणि गुरु या तिन्ही रूपांची पूजा करण्याचा नियम आहे.


संततीप्राप्तीसाठी या महिन्यात श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा करावी. प्रेम आणि आनंदाच्या प्राप्तीसाठी श्रीकृष्णाच्या तरुण रूपाची पूजा करावी. याशिवाय ज्ञानप्राप्तीसाठी गुरु कृष्णाची पूजा करावी.