Auspicious Yoga: भगवान राम-श्रीकृष्णाच्या कुंडलीत होते हे पाच योग, जाणून घ्या
Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार जातकाच्या कुंडलीत पाच पैकी एक जरी योग असला तरी नशिब फळफळतं. जीवनात संघर्ष करावा लागत नाही. पंचमहापुरुष योग शनि, शुक्र, बुध, गुरू आणि मंगळ यामुळे तयार होतो.
Auspicious Yoga In God Ram And Krishna's Kundali: हिंदू धर्मशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्र एक जुनं विज्ञान असल्याचं मानलं जातं. ज्योतिषशास्त्राच्या मदतीने भविष्याचा वेध घेतला जातो. पूजा विधी आणि तोडगे वापरून ग्रहाची स्थिती अनुकूल केली जाते. तर कुंडलीतील काही दोषांवर उपाय करून ते सौम्य केले जातात. मात्र कोट्यवधी लोकांमध्ये एखाद्या व्यक्तीची नशिबात ग्रहांची स्थिती अनुकूल असते. ज्योतिषशास्त्रानुसार काही योग शुभ, तर काही योग अशुभ असतात. कुंडलीतील पाच योगांना शुभ मानलं जातं. भगवान श्रीकृष्ण आणि रामाच्या कुंडलीतही असे होते. त्यामुळे त्यांना पंच महापुरुष योग संबोधलं जातं. जर एखाद्याच्या कुंडलीत असा योग असल्यास त्यांना संघर्ष करावा लागत नाही.
पंचमहापुरूष योग शनि, शुक्र, बुध, गुरू आणि मंगळ मिळून तयार होतो. पाच ग्रहांच्या केंद्र या मूळ त्रिकोणात असल्यास व्यक्तीला नशिबाची साथ मिळते. पंचमहापुरुष योग हे ग्रह केंद्रात असल्यावर तयार होतो. शनिचा शश योग, बुधचा भद्र योग, मंगळाचा रुचक योग, शुक्राचा मालव्य योग आणि गुरुचा हंस योगाचा समावेश आहे.
शश योग- कुंडलीत शश योग असलेले लोक कूटनीतीमध्ये पारंगत असतात. त्यांना दीर्घायुष्य लाभतं आणि ते न्यायी आहेत. कोणत्याही परिस्थितीत तग धरण्याची क्षमता असते. तसेच शत्रूंना चीत करण्याची क्षमता असते. कुंडलीतील चढत्या किंवा चंद्रापासून 1, 4, 7 किंवा 10व्या भावात शनी तूळ किंवा कुंभ राशीमध्ये असतो तेव्हा हा योग तयार होतो.
भद्र योग- कुंडलीतील या योगामुळे लोक व्यवसाय, गणित, लेखन आणि सल्लागार क्षेत्रात खूप नाव कमावतात. त्यांच्यात हुशारी, बुद्धिमत्ता असते. तसेच असे लोक छान प्रकारे विश्लेषण करतात. जर बुध चंद्राच्या 1, 4, 7 व्या भावात किंवा कन्या आणि मिथुन राशीच्या 10व्या भावात स्थित असेल तर हा योग तयार होतो.
बातमी वाचा- December Gochar 2022: शुक्र ग्रह दोनदा करणार राशी परिवर्तन, या राशींना मिळणार लाभ
रुचक योग- कुंडलीत असा योग असलेले लोक झटपट निर्णय घेतात. एखाद्या गोष्टीवर त्यांची मजबूत पकड असते. असे लोक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत असतात. मंगळ कुंडलीत लग्न किंवा चंद्रापासून 1, 4, 7 किंवा 10व्या घरात मकर, वृश्चिक किंवा मेष राशीत असेल तर रुचक योग तयार होतो.
मालव्य योग- कला, संगीत, गाणी या क्षेत्रात हा योग असलेले लोक नाव कमावतात. शारीरिक शक्ती, सामर्थ्य आणि धैर्याने परिपूर्ण आहेत. शुक्र कुंडलीत लग्न किंवा चंद्रापासून 1,4,7 किंवा 10 व्या स्थानात मीन, तूळ किंवा वृषभ राशीत स्थित असेल तर मालव्य योग तयार होतो.
हंस योग- कुंडलीत असा योग असलेल्या लोकांपुढे अख्खं जग नतमस्तक होतं. या लोकांना समृद्धी, सुख आणि अध्यात्मात उच्च कोटीचं ज्ञान प्राप्त असतं. गुरु ग्रह धनु राशीमध्ये किंवा मीन राशीमध्ये कुठेही असल्यास हा योग तयार होतो. बृहस्पति जर मीन, धनु किंवा कर्क राशीत 1, 4, 7 किंवा 10व्या घरात असेल तर हंस योग तयार होतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)