Shani Dev Margi in October:  प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलतो आणि वक्री होतो. शनि हा देखील या ग्रहांपैकी एक आहे. सध्या शनि ग्रह मकर राशीत वक्री अवस्थेत आहे. पण 23 ऑक्टोबरापासून शनि मार्गस्थ होणार आहे. असं होताच शनिच्या साडेसाती आणि अडीचकीचा प्रभावाखाली असलेल्या राशींना दिलासा मिळू शकतो. न्यायदेवता शनि मार्गस्थ होणार असल्याने काही राशींना शुभ परिणाम मिळतील. त्यांच्यासाठी प्रगतीचे नवे मार्ग उघडतील. या काळात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. उत्पन्न वाढीबरोबरच व्यवसायात वाढ होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष: शनि मार्गस्थ होत असल्यामुळे मेष राशीसाठी ऑक्टोबर महिना खूप चांगला राहील. या काळात तुम्हाला कामात यश मिळू शकते. नोकरदारांशी संबंधित लोकांना आर्थिक लाभ मिळेल आणि कुटुंबाची स्थिती चांगली राहील.


कर्क: या राशीच्या लोकांना शनिदेवाच्या मार्गस्थ होण्याचा खूप फायदा होईल. हा महिना खूप खास असेल. कौटुंबिक समस्यांपासून मुक्ती मिळेल. व्यवसायात आर्थिक स्थिती मजबूत राहील. जर एखाद्याचे पैसे अडकले असतील तर ते या काळात परत मिळू शकतात.


तूळ: मकर राशीतून शनि मार्गी होणार असल्याने तूळ राशीच्या लोकांनाही लाभ होईल. या काळात आर्थिक स्थिती चांगली राहील. आर्थिक संकटातून सुटका मिळेल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना खूप चांगला जाणार आहे.


वृश्चिक: या राशीच्या लोकांसाठी शनीची स्थिती शुभ ठरेल. या काळात उत्पन्नात वाढ होऊन व्यवसायात वाढ होईल. नवीन संधी उपलब्ध होतील. कौटुंबिक समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल.


मीन: या राशीच्या लोकांसाठी शनि मार्गस्थ होणे शुभ ठरेल. या राशीच्या लाभ स्थानात शनिदेवाचे भ्रमण होणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना या काळात प्रचंड आर्थिक लाभ मिळू शकतो. नोकरीत बढतीचीही संधी मिळेल. घर आणि कुटुंब आनंदी राहील.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)