सुख, समृद्धी आणि शांतीसाठी घरात अशा पद्धतीने ठेवा देवाची मूर्ती, नाहीतर होतील विपरीत परिणाम
तुम्हाला हे माहित आहे की, देवघरात देवाची मूर्ती ठेवण्याचे काही धार्मिक नियम आहेत.
मुंबई : प्रत्येक हिंदू घरात देवघर हे असतंच. ज्यामध्ये ते वेगवेगळ्या देवांचे फोटो किंवा मूर्ती ठेवून पूजा करतात. परंतु तुम्हाला हे माहित आहे की, देवघरात देवाची मूर्ती ठेवण्याचे काही धार्मिक नियम आहेत. ज्यानुसार मूर्तीला एका विशिष्ट जागी ठेवण्याविषयी शास्त्रामध्ये सांगतेल गेले आहे. त्यामुळे घरामध्ये मूर्ती व्यवस्थित ठेवल्यास त्याचे शुभ फळ मिळते असे मानले जाते. एवढेच काय तर आपल्या गुरुंचे फोटो लावण्याबाबत ही वेगळे नियम आहेत. अशा परिस्थितीत देवाच्या मूर्ती घरात कशा ठेवाव्यात हे जाणून घ्या. त्यामुळे तुमच्या जीवनात सुख-समाधान येईल.
एकाच वेळी अनेक मूर्ती ठेवू नका
धार्मिक शास्त्रानुसार देवाला कोणत्याही रूपात ठेवता येते. हे दगडी शिल्प, धातूचे शिल्प किंवा अगदी चित्र असू शकते. परंतु हे लक्षात घ्या की, घरात जास्त मूर्ती एकत्र ठेवू नयेत. वास्तविक देवाच्या अनेक मूर्ती घरात ठेवणे योग्य मानले जात नाही. फोटोंच्या बाबतीतही असेच आहे.
शिव कुटुंबाची मूर्ती लावणे शुभ
शिवलिंग आणि शिव परिवाराची मूर्ती घरात ठेवण्यासाठीही विशेष नियम देण्यात आले आहेत. ज्याकडे बहुतेक लोक दुर्लक्ष करतात. घरात शिवलिंग नसून शिव परिवाराची मूर्ती असावी. ज्यानुळे घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांती राहाते. खरेतर शिवलिंग हे शिवमंदिरांसाठीच असते, त्याला घरात ठेवू नये. पण बरेच लोक शिवलिंग आपल्या घरात ठेवतात. जर शिवलिंग आधीपासून घरात असेल, तर कोणत्याही मंदिरात ठेवावे.
बेडरूममध्ये कोणतीही मूर्ती ठेवू नका
बेडरूममध्ये देवाची मूर्ती ठेवणे चांगले मानले जात नाही. अनेकजण घरातील बेडरूममध्ये राधा-कृष्णाच्या मूर्ती ठेवतात. तसे पाहाता तुम्ही त्याचे फोटो ठेऊ शकता परंतु त्याची मुर्ती कधीही ठेवू नये. बेडरूममध्ये कोणत्याही प्रकारची मूर्ती ठेवणे अशुभ मानले जाते.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)