Mangal Uday 2024: ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही ग्रहाचा उदय आणि अस्त यांचा कालवधी अत्यंत महत्वाचा मानला जातो. ग्रहाचा उदय आणि अस्त यांचा परिणाम राशींवर होत असतो. मंगळ सध्या अस्ताच्या मार्गावर आहे. थेट जानेवारी महिन्यात मंगळ पुन्हा उदयाला येणार आहे.  याचा परिणाम काही ठराविक राशींच्या लोकांवर होणार आहे. यामुळे पुढचे दोन महिने हे संबधित राशींच्या लोकांसाठी धोक्याचे असणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

23 सप्टेंबर रोजी मंगळाचा अस्त झाला आहगे.  85 दिवस मंगळ हा कन्या राशीत राहणार आहे. अशा स्थितीत ग्रहस्थितीत बदल होणार आहे. परिणामी काही राशीच्या लोकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 24 सप्टेंबर रोजी मंगळ  कन्या राशीत आला आहे. 17 जानेवारी 2024 पर्यंत मंगळ हा कन्या राशीत स्थिर राहणार आहे.


या राशीच्या लोकांसाठी धोक्याचा काळ


मंगळाच्या अस्तामुळे हा काळ वृषभ आणि मेष राशीसह अनेक राशींसाठी अत्यंत धोकादायक असणार आहे. या काळात राहू मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा सप्तक योग तयार होणार आहे. याचा परिणाम अनेक राशींवर होणार आहे. ठराविक राशींची अस्वस्थता वाढू शकते. प्रचंड नुकसान देखील सहन करावे लागू शकते. कन्या राशीत मंगळाच्या अस्तामुळे या राशीच्या लोकांना खूप जास्त काळजी घ्यावी लागणार आहे.


ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांसाठी मंगळाची स्थिती जड असणार आहे. या काळात मंगळ  सहाव्या स्थानावर स्थित असणार आहे. अशा परिस्थितीत मेष राशींच्या लोकांसाठी हा काळ आव्हानांनी भरलेला असणार आहे. व्यावसायिकांना व्यावसायिक कामात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. नोकरू करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी कामाचा ताण राहील. अशा स्थितीत मनात असंतोष निर्माण होवू शकतो. व्यवसायात नुकसान सहन करावे लागू शकते.  


वृषभ राशीच्या लोकांना मंगळाच्या अस्ताचे प्रतिकूल परिणाम दिसतील. या राशीच्या लोकांना खूप कष्ट करावे लागू शकतात. कठोर परिश्रम घेवूनही अपेक्षित फळ मिळणार नाही. ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढेल. परिणामी कामात चुका होवू शकतात. उत्पन्नात अडथळे येतील.  ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीच्या लोकांसाठी मंगळाची स्थिती अनुकूल राहणार नाही. मेहनत घेवूनही अपयशाचा सामना करावा लागू शकतो. सहकारी आणि वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल याची अपेक्षा ठेवूच नका. अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. दूरचा प्रवास केल्याने नुकसान होऊ शकते.


ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांसाठी मंगळ ग्रहाची स्थिती आश्वासक ठरणार नाही. अशा स्थितीत मंगळ तुमच्या 12व्या घरात बसेल. यावेळी तुम्ही कोणताही प्रवास कराल, परंतु अपेक्षित परिणाम न मिळाल्याने तुमची चिंता वाढेल. नोकरीशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्याचबरोबर व्यापार उद्योगात तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. या काळात तुमच्या कामात अनेक अडथळे येऊ शकतात.