Sun Transit In Scorpio 2023: ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह आपापल्या विशिष्ट वेळी त्याच्या राशीमध्ये गोचर करतो. त्यानुसार सूर्य दर 30 दिवसांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो. नोव्हेंबरमध्ये सूर्य 17 नोव्हेंबरला वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. ग्रहांचा राजा सूर्याचं गोचर सर्व 12 राशींच्या जीवनावर परिणाम करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्य देव ज्यावेळी त्यांच्या राशीमध्ये बदल करतात त्यावेळी परिणाम व्यक्तीच्या सर्व राशींच्या व्यक्तींवर झाला आहे. सूर्याचे गोचर काही राशींसाठी शुभ ठरणार असलं तरी काही राशीच्या लोकांना यावेळी सतर्क रहावं लागणार आहे. जाणून घेऊया कोणत्या 3 राशींमध्ये सूर्याचे संक्रमण लोकांच्या जीवनात संकट निर्माण करणार आहे.


मकर रास


ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्याच्या गोचर मकर राशीच्या लोकांच्या खिशावर मोठा परिणाम होणार आहे. मकर राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या व्यक्तींना त्याच्या वैवाहिक जीवनात समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. आरोग्याशी संबंधित समस्या त्रास देऊ शकतात. मानसिक तणाव राहण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्टीकोनातून हा काळ थोडा कमजोर असू शकतो.


कुंभ रास


17 नोव्हेंबरला सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. या व्यक्तींचे त्यांच्या जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. एवढेच नाही तर व्यक्तीला कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहावं लागणार आहे. या काळात व्यक्तीला संयम ठेवावा लागू शकतो. कोणतेही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर यावेळी करू नका. 


कन्या रास


ज्योतिष शास्त्रानुसार कन्या राशीच्या लोकांसाठी हे अशुभ मानलं जातंय. या काळात व्यक्तीला कधीही वैवाहिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. याशिवाय आर्थिक जीवनातही पैशांशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. व्यक्तीला भांडणापासून दूर राहावे लागेल. कोणत्याही व्यक्तीवर आंधळेपणाने विश्वास ठेऊ नका. कुटुंबातील कोणत्याही आजारावर पैसे खर्च होऊ शकतात. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )