कर्क राशीत बनला `त्रिग्रही योग`; `या` राशींवर सूर्यदेवाची असणार विशेष कृपा
Tirgrahi Yog In Cancer : बुध आणि सूर्य देव कर्क राशीत भ्रमण करतायत. यासोबतच चंद्राने कर्क राशीत प्रवेश केलाय. सूर्य, बुध आणि चंद्र यांच्यामुळे त्रिग्रही योग तयार झाला आहे.
Tirgrahi Yog In Cancer : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह काही ठराविक अंतराने दुसऱ्या राशीमध्ये गोचर करतात. यावेळी काही शुभ किंवा अशुभ योग तयार होत असतात. दरम्यान या योगांचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येतो. बुध आणि सूर्य देव कर्क राशीत भ्रमण करतायत. यासोबतच चंद्राने कर्क राशीत प्रवेश केलाय. बुध, सूर्य आणि चंद्र कर्क राशीत आहेत.
सूर्य, बुध आणि चंद्र यांच्यामुळे त्रिग्रही योग तयार झाला आहे. या राजयोगाचा सर्व राशीच्या लोकांवर प्रभाव दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांना याचा सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. यावेळी धनलाभाची शक्यता दिसून येतेय. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
मेष रास ( Aries Zodiac )
त्रिग्रही योग तुमच्यासाठी शुभ सिद्ध होणार आहे. हा योग तुमच्या राशीतून चौथ्या घरात तयार होणार आहे. ज्याद्वारे तुम्ही सर्व भौतिक सुखं मिळवू शकता. या काळात तुम्ही मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. तुमची आर्थिक स्थितीही यावेळी सुधारण्यास मदत होणार आहे. तुम्हाला नोकरी-व्यवसायात यश मिळू शकतं. कुटुंबामध्ये काही अडचणी असतील तर त्या दूर होतील.
कन्या रास ( Virgo Zodiac )
त्रिग्रही योग तयार झाल्याने कन्या राशीच्या लोकांसाठी अच्छे दिन येणार आहेत. यावेळी तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. यासोबतच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. आर्थिक दृष्टिकोनातून ही वेळ खूप अनुकूल असेल. काही चांगली बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या मेहनतीमुळे तुम्हाला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. शेअर बाजारातून तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे.
तुळ रास ( Libra Zodiac )
त्रिग्रही योगाची निर्मिती करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींसाठी हा काळ चांगला आहे. नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. नोकरदार लोकांना नोकरीच्या क्षेत्रात केलेल्या मेहनतीमुळे पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर परिवाराची साथ तुमची सर्व काम पूर्ण होणार आहेत.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )