मुंबई: अनेकदा प्रयत्न करूनही हवं तसं यश मिळत नाही. त्यामुळे नशिबाला दोष देण्याशिवाय पर्याय उरत नाही. कुंडलीतील शुभ योग एखाद्या व्यक्तीला राजासारखे जीवन देतात. जर व्यक्तीच्या कुंडलीत अशुभ योग असेल तर अथक परिश्रम करूनही त्यांच्या आयुष्यातील संघर्ष संपत नाही आणि आर्थिक स्थिती सुधारत नाही. त्यामुळे कुंडलीतील शुभ आणि अशुभ योगांना ज्योतिष शास्त्रात खूप महत्त्व देण्यात आले असून त्यांच्याशी संबंधित उपायही सांगण्यात आले आहेत.  पितृदोष हा देखील असाच अशुभ योग आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या व्यक्तीवर पूर्वजांचा आशीर्वाद नसतो, अशा व्यक्तींच्या कुंडलीत हा दोष तयार होतो. दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न करणे, श्राद्ध विधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि समस्या निर्माण होतात. पितृदोषामुळे करिअरमध्ये प्रगती होत नाही.  त्यामुळे पितृदोषाचे निवारण लवकरात लवकर करावे.


पितृदोषापासून मुक्ती कशी मिळेल


-अमावास्येला पूजा करा, तर्पण-श्राद्ध करा, दान करा. यामुळे पितरांना प्रसन्नता मिळते.


-रोज सकाळी स्नान करून त्या पाण्यात काळे तीळ आणि अक्षत टाकून पितरांना अर्घ्य द्यावे.


-दुपारी पिंपळाच्या झाडाला पाणी, फुले, अक्षत, दूध, गंगाजल, काळे तीळ अर्पण करून पितरांचा आशीर्वाद घ्यावा. पिंपळाचे झाड कधीही तोडू नये किंवा त्याखाली घाण करू नये. यामुळे पितृदोष लागतो.


-पितृदोषाच्या निवारणासाठी अमावस्या, पौर्णिमा किंवा पितृ पक्षात श्राद्ध करावे. यामुळे पूर्वज आशीर्वाद देतात आणि व्यक्तीच्या जीवनात प्रगती होते.


-श्राद्धात पितरांच्या आवडीचे अन्न तयार करून ब्राह्मणाला आदराने खाऊ घालावे. गरिबांनाही अन्न द्यावे.


-करिअर-व्यवसायातील अडथळे दूर करण्यासाठी गरिबांना दान करा.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE24TAAS याची पुष्टी करत नाही.)