Zodiac Sign: राशीभविष्याचा विषय येतो तेव्हा तेव्हा मैत्रीच्या नात्यामध्येही त्याचे होणारे परिणाम आणि प्रभाव लक्षात घेणं गरजेचं असतं. वास्तुशास्त्र, समुद्रशास्त्र आणि इतरही बऱ्याच गोष्टींमध्ये मैत्रीच्या नात्याकडेही तितक्याच गांभीर्यानं पाहिलं जातं. चला, तर मग जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तींची मैत्री देणार तुमची आयुष्यभराची साथ... (Friendship Zodiac Sign friends for life)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष- या राशीच्या मंडळींना मैत्री करण्यात कोणतीही अडचण येत नाही. ते स्वत:हूनच मैत्रीचा हात पुढे करतात. त्यांच्यालेखी मित्रांमध्ये कोणत्याही अडचणी नसतात. 


वृषभ- ही मंडळी मैत्रीच्या नात्यात माफीही तितक्याच सहजपणे करतात. त्यांना कोणाशीही ताळमेळ साधण्यात अडचणी येत नाहीत. 


मिथुन- अशा व्यक्ती मैत्री करण्यापूर्वी दहावेळा विचार करतात. यांचे मित्र बरेच असतात. पण, जवळची मैत्री मात्र मोजक्यांशीच असते. 


कर्क- या राशीच्या व्यक्तींशी तेव्हाच मैत्री करता येते जेव्हा त्यांना नात्यात समर्पण आणि स्वातंत्र्याची अनुभूती होते. 


सिंह- या राशीच्या व्यक्ती मैत्रीला एक महत्त्वाचा घटक मानतात. त्यांना मित्रांसोबत वेळ घालवणं प्रचंड आवडतं. 


कन्या- ही माणसं मैत्रीला कायम चांगल्या नजरेतून पाहतात. मित्रांशिवाय जगणं व्यर्थ, अशीच त्यांची धारणा. 


तुळ- जगण्याला खरा अर्थ देण्यासाठी आणि जगणं अधिक सुंदर बनवण्यासाठी मैत्री गरजेचीच, असं ही मंडळी मानतात. 


वृश्चिक - मैत्री हे आयुष्यातील सर्वात महत्त्वाचं नातं, असं ही मंडळी मानतात. मित्रांसाठी ते मोठ्यातला मोठा त्यागही करतात. 


धनू- या व्यक्ती अतिशय विचारपूर्वकपणे मैत्री करतात. पण, जेव्हा ते मैत्री करतात तेव्हा या नात्याला ते कुटुंबीयांपैक्षाही जास्त समर्पकपणे निभावतात. 


मकर- ही माणसं बुद्धिमान मित्रांचीच निवड करतात. फार कमी मित्रांशी त्यांची जवळीक असते. 


कुंभ - या राशीच्या व्यक्तींसाठी मैत्री साधासुधा शब्द नाही. एकदा का यांनी कोणाशी मैत्री केली, की ती मैत्री आयुष्यभरासाठी टिकवली जाते. 


मीन- या राशीचे व्यक्ती मैत्रीला समजुतदारपणाची उपमा देतात. मैत्री माणसाला घडवते अशीच त्यांची धारणा. 


काय मग, तुमच्या खास मित्राची किंवा मैत्रीणीची रास कोणती?