Jupiter and Moon Conjunction: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ज्यावेळी ग्रहांचं परिवर्तन होतं तेव्हा त्याचा परिणाम प्रत्येक राशीवर होताना दिसतो. यावेळी काही राशींवर याचा विपरीत परिणाम दिसून येतो, तर काहींना चांगल्या परिणामांना सामोरं जावं लागतं. लवकरच गुरू आणि चंद्रापासून ( Jupiter and Moon Conjunction ) गजकेसरी योग ( Gajakesari Yog ) तयार होतो. हा योग अतिशय शुभ मानला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काहीवेळी एखादा ग्रह भ्रमण करतो तेव्हा त्याचा दुसऱ्या ग्रहाशी संयोग होऊन अनेक शुभ-अशुभ योग निर्माण होतात. 17 मे रोजी गुरू आणि चंद्राचा संयोग होणार असून यावेळी गजकेसरी योग ( Gajakesari Yog ) तयार होणारे. हा योग लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हा योग फायदेशीर आहे. 


कधी होणार गजकेसरी योग?


17 मे रोजी संध्याकाळी 7.39 वाजता चंद्र मीन राशीतून मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे. 19 मे पर्यंत तो या राशीत वास्तव्य करणार आहे. 


या राशीच्या व्यक्तींना होणार लाभ


मेष रास


गजकेसरी राजयोग ( Gajakesari Yog ) तयार झाल्यामुळे या राशीच्या लोकांना मोठे लाभ होणार आहेत. यावेळी कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे. तुमच्या मनाजोगं काम होणार आहे. या काळात या राशीच्या लोकांना संपत्ती आणि समृद्धी मिळणार आहे. तुमचे एखाद्या ठिकाणी पैसे अडकले असतील तर ते मिळू शकतील. कुटुंबामध्ये सर्व गोष्टी सुरळीत होणार आहेत.


मिथुन रास


गुरु आणि चंद्राच्या संयोगामुळे ( Jupiter and Moon Conjunction ) या राशीच्या लोकांसाठी अनुकूल मिळणार आहेत. तुम्हाला समाजात मान, स्थान आणि प्रतिष्ठा मिळू शकते. अडकलेली काम मार्गी लागण्यास मदत होणार आहे. यावेळी तुम्हाला अचानक आर्थिक लाभ देखील होण्याची शक्यता आहे.


तूळ रास


या राशीच्या व्यक्तींना देखील गजकेसरी योग फायदेशीर ठरणार आहे. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाणार असून त्याने तुम्ही आनंदित व्हाल. या काळात व्यवसाय आणि नोकरीमध्ये तुम्हाला भरघोस यश मिळू शकणार आहे. मित्रांसोबत तुम्ही बाहेर फिरायला जाऊ शकता. कामाच्या ठिकाणी तुम्हाला इतरांची मदत मिळणार आहे. 


(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचं समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)