Gajkesari Yog: तुळशीच्या लग्नाला बनला गजकेसरी राजयोग; `या` राशींवर बरसणार पाण्यासारखा पैसा
Tulsi Vivah Gajkesari Yog: हिंदू कॅलेंडरनुसार, चंद्र 24 नोव्हेंबरला संध्याकाळी 4 वाजता मेष राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी तो 26 नोव्हेंबरला संध्याकाळी 7:55 पर्यंत राहणार आहे. देवांचा गुरू बृहस्पति आधीच मेष राशीत आहे. अशा स्थितीत चंद्र आणि गुरूच्या संयोगामुळे गजकेसरी योग तयार झाला आहे.
Tulsi Vivah Gajkesari Yog: कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुळशीविवाह केला जातो. यंदा हा सण 24 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी लक्ष्मीचे रूप असलेल्या तुळशीची आणि विष्णूचे रूप असलेल्या शालिग्रामची पूजा विधीपूर्वक केली जाते. यंदाच्या वर्षी तुळशीविवाहाच्या निमित्ताने अनेक शुभ योगांसोबत गजकेसरी योगही तयार होणार आहे. जाणून घेऊया तुलसी विवाहात गजकेसरी योगाचा लाभ कोणत्या राशींना मिळणार आहे.
हिंदू कॅलेंडरनुसार, चंद्र 24 नोव्हेंबरला संध्याकाळी 4 वाजता मेष राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी तो 26 नोव्हेंबरला संध्याकाळी 7:55 पर्यंत राहणार आहे. देवांचा गुरू बृहस्पति आधीच मेष राशीत आहे. अशा स्थितीत चंद्र आणि गुरूच्या संयोगामुळे गजकेसरी योग तयार झाला आहे. यासोबतच 24 नोव्हेंबरला तुळशी विवाहासह सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी योग तयार झाला आहे. या योगांच्या निर्मितीमुळे काही राशींना संपत्ती आणि ऐश्वर्याचे भरपूर लाभ मिळू शकणार आहे.
मेष रास (Mesh Zodiac)
या राशीत बृहस्पति, देवतांचा गुरु आणि चंद्र यांचा संयोग झाला आहे. यावेळी 2024 पर्यंत, या राशीच्या लोकांवर भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची कृपा असणार आहे. प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेली कामं पुन्हा सुरू होऊ शकतात. विद्यार्थ्यांना चांगले निकालही मिळू शकतात. व्यवसायात अपार यश मिळून तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. जर तुमचे प्रेमसंबंध चालू असतील तर तुम्हाला त्यात यश मिळू शकते.
कर्क रास (Kark Zodiac)
गजकेसरी योग केवळ या राशीच्या लोकांसाठी आनंद आणू शकणार आहे. या राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असणार आहे. जीवनातील प्रत्येक समस्या संपुष्टात येऊ शकते. वाहन, मालमत्ता खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. वडिलधाऱ्यांच्या मदतीने व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते.
कुंभ रास (Kumbh Zodiac)
या राशीमध्ये तृतीय घरात गजकेसरी योग तयार झाला आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. करिअरमध्ये नवीन उंची गाठू शकतात. तुम्हाला 2024 मध्ये फायदे मिळणार आहेत. कर्जमुक्तीमुळे बँक बॅलन्स वाढणार आहे. कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्येही यश मिळू शकतं. कुटुंबातील सुख-सुविधांमध्येही वाढ होणार आहे. कोणतीही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होणार आहे.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )