Ganesh Chaturthi 2022 : कसं असावं बाप्पाच्या नैवेद्याचं पान, `हा` पदार्थ अजिबात विसरु नका; नाहीतर...
गणपतीच्या नैवेद्याचं पान तयार करताय? थांबा आधी हे वाचा
Ganesh Chaturthi 2022 : बहुप्रतिक्षित मंगलपर्वाला आता सुरुवात झाली आहे. अर्थात गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2022) दणक्यात सुरुवात झाली आहे. आता पुढचे 10 दिवस बाप्पा आपल्यासोबत आपल्या घरात, परिसरात असणार आहेत. प्रत्येकजण या गजवदनाच्या आराधनेमध्येत मग्न झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. (Ganesh Chaturthi 2022 Bhog prasadam naivedya modak Durva)
गणपतीची सेवा करण्यात काहीच कमी पडाला नको, यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहे. मनातल्या सर्व ईच्छा पूर्ण करणाऱ्या या बाप्पाची सेवा करताना त्याच्यासाठी नैवेद्याचं पान तयार करण्यातही कसलीच कमतरता सोडली जात नाहीये. तुम्हाला माहितीये का, (Naivedyam) नैवेद्याच्या साग्रसंगीत पानानंही गणरायाचा प्रसन्न करता येऊ शकतं.
गणपतीपुढे जरुर लावा या गोष्टींचा भोग...
(Modak and durva) मोदक आणि दुर्वा... या गणपतीला (Ganpati) अतिशय प्रिय. धर्म आणि शास्त्रांनुसार या दोन्ही गोष्टींशिवाय गणपतीची पूजा अपूर्ण राहते. दुर्वा आणि मोदकांचा नैवेद्य गणरायाला दाखवल्यास तो आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतो. शिवाय मोतीचूर लाडूही नैवेद्यात असावेत.
Ganesh Chaturthi 2022 : फाटू न देता कसे बनवाल Perfect उकडीचे मोदक? एकदा हे करुन पाहाच
नैवेद्याच्या बाबतीत लक्षात ठेवा 'या' गोष्टी...
ईष्ठदेवता गणपतीला नैवेद्य दाखवताना एका गोष्टीचं भान ठेवा, की जेवणाच्या पानात सर्व सात्विक पदार्थांचा समावेश केला जातोय. कोणत्याही पदार्थामध्ये (Garlic onion) लसुण, कांदा किंवा तिखट मसाल्यांचा वापर टाळा. स्नान करुनच नैवेद्याच्या तयारीला लागा. त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सामग्रीचं शक्य असल्यास शुद्धीकरण करुन घ्या, घरात सकारात्मक वातावरण (Positive vibes) ठेवा. कोणाच्याही बाबतीत वाईट विचार करु नका आणि मनात एखादा संकल्प करुन देवापुढे नैवेद्याचं पान ठेवा.