मुंबई : Surya Singh Yuti on Ganesh Chaturthi 2022: ज्योतिषशास्त्रानुसार, 31 ऑगस्ट रोजी शुक्र ग्रह आपली राशी बदलून सिंह राशीत प्रवेश करत आहे. सूर्य सिंह राशीचा स्वामी आहे आणि तो सिंह राशीत आधीपासूनच आहे. शुक्र धन, सौंदर्य, प्रेमाचा कारक आहे आणि सूर्य यश, आत्मविश्वास, आरोग्य देतो. अशा परिस्थितीत गणेश चतुर्थीच्या दिवशी या दोन महत्त्वाच्या ग्रहांच्या संयोगाचा परिणाम सर्व 12 राशींवर होईल. यापैकी 4 राशी अशा आहेत की त्यांना देवी लक्ष्मीच्या कृपेने भरपूर पैसा मिळेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष: शुक्राचे संक्रमण मेष राशीच्या लोकांना मोठा लाभ होईल. त्यांच्या जीवनात सुख-सुविधा वाढतील. वडिलांकडून मदत मिळेल. ज्यामुळे तुमच्या अनेक समस्या दूर होतील. उत्पन्न वाढेल. गुंतवणुकीसाठी चांगली वेळ आहे. गुंतवणुकीसाठी अतिरिक्त पैसा लावा. कोणतीही भेटवस्तू मिळू शकते. 


गणेश चतुर्थीला या रंगाचा बाप्पा घरी आणा, सर्व इच्छा होतील पूर्ण


वृषभ: शुक्राच्या राशीतील बदल वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप लाभदायक राहील. कारण या राशीचा स्वामी शुक्र आहे. त्यांची आर्थिक प्रगती होईल. हातात पुरेसे पैसे मिळाल्याने तुम्हाला आराम वाटेल. आदर वाढेल. तुम्हाला कुठूनही चांगली बातमी मिळू शकते. 


सिंह: शुक्र आपली राशी बदलून सिंह राशीत प्रवेश करत आहे. या राशीत शुक्र आणि सूर्याची युती या लोकांना खूप लाभ देईल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळेल. पगार वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. करिअरमध्ये प्रगती आनंद देईल. 


कुंभ : शुक्राचे संक्रमण कुंभ राशीच्या लोकांचे जीवन आनंदाने भरुन टाकेल. त्यांना प्रेम, पैसा, आदर सर्वकाही मिळेल. धनलाभ होईल. जीवनात सुख-सुविधा वाढतील. करिअरमध्ये प्रगती होईल. व्यापाऱ्यांचा व्यवसाय वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.


 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे  ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)