Ganesh Chaturthi 2024 : शुभ कार्याची सुरुवात किंवा कुठलीही पूजा असतो प्रथम गणरायाची पूजा केली जाते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वेड लावणारा बाप्पा लवकरच घरी येणार आहे. त्यामुळे सर्वत्र गणेशाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. गणेशोत्सवाचा आनंद घेण्यासाठी शास्त्रानुसार बाप्पाची प्राणप्रतिष्ठा, नैवेद्य आणि विसर्जनापर्यंतचे 21 नियम लक्षात ठेवा. 


गणेशाला प्रसन्न करण्यासाठी पाळा 'हे' 21 नियम!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. घरात बाप्पा आणताना घराच्या मुख्य दरवाज्यावर यजमानांच्या पायावर दूध पाणी घाला. त्यानंतर त्यांचं औक्षण करा. 
2. गणेश स्थापना स्थळी थोडे तांदूळ घालून त्यावर पाट ठेवा. त्यानंतर त्यावर बाप्पाला ठेवा. एक लक्षात ठेवा मूर्तीचं मुख वस्त्राने झोकून असावे. 
3. गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी आंघोळ करु शुचिर्भूत व्हा. त्यानंतर कपाळी तिलक करुन जर तुमचं मुंज झालेली असल्यास यज्ञोपवित धारण करा. 
4. गणेश प्राणप्रतिष्ठेच्या आधी घरातील देवतांची पूजा करुन घ्या. 
5. बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करताना त्याच्या मुखावरील वस्त्र काढून ठेवा. 
6. बाप्पाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला समई, निरांजन, ऊदबत्ती, कापूर दाणी ठेवावी. 
7. गणरायच्या चरणी लावण्यात येणाऱ्या दिव्यांना गंध, हळद, कुंकू लावावं. 
8. विघ्नहर्त्यासमोर विड्याची दोन पानं, त्यावर सुट्टे पैसे, सुपारी असे पाच विडे ठेवा. 
9. बाप्पासमोर मोदकाचे नैवेद्य दाखवताना त्या ताटाखाली पाण्याने चौकोनी मंडल नक्की करा. 
10. गणरायाला पंचामृत नक्की दाखवा. 


हेसुद्धा वाचा - Ganesh Chaturthi 2024 : फक्त 'या' शुभ मुहूर्तावर होणार प्राणप्रतिष्ठापना, यंदा गणेश चतुर्थीला 4 शुभ योग, जाणून घ्या तिथी अन् शुभ मुहूर्त


11. मोदक, पेढे इत्यादी नैवेद्य हे कधीही बॉक्समध्ये ठेवू नयेत. एखाद्या वाटीत किंवा ताटात मांडावे. 
12. जानवे सोडवून, मोकळं आणि ओले करून पूजेसाठी तयार ठेवावे. 
13. बाप्पासाठी कापसाचे 21 मण्यांचं वस्त्र नक्की करा. 
14. पूजा करताना यजमानांनी ऊपरणं सोहळं घालून पूजा करावीत. पूजा करताना स्वच्छ आसन असावं. 
15. बाप्पासमोर पूजेसाठी तांब्या, ताम्हन, पळी इत्यादी भांडे लख करुन छान मांडणी करा. 
16. गणरायाला आपल्या डाव्या हाताला पाण्याने भरलेला तांब्या ठेवा. उजव्या बाजूला फुलपात्र, पळी आणि उजव्या बाजूला ताम्हन ठेवा. 
17. देवाचे सगळे दागिनी पूजेपूर्वी किंवा नंतर बाप्पाला परिधान करा. 
18. बाप्पासाठी 21 दूर्वांच्या 21 जुड्या नक्की ठेवा. सोबतच बिल्वपत्रे, तुळस, शमी आणि शक्य असल्यास 21 प्रकारच्या पत्री देवाला ठेवा. सोबत जास्वंदाचे फुलं नक्की अर्पण करा. 
19. हळद, कुंकू, गुलाल, शेंदूर, बुक्का, केशर अष्टगंध पूजेसाठी आवर्जून ठेवा. 
20. पूजा सुरु झाली की फुलपात्रात गरम पाणी नक्की घ्या.
21. बाप्पाची प्राणप्रतिष्ठा अती भक्तिभावाने करा. महानैवेद्यनंतर महाआरती करा. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)