राशीभविष्य : गणेश चतुर्थीनिमित्त `या` राशींना होणार फायदा
तर, या राशींनी घ्या काळजी
मेष - आत्मविश्वासाच्या बळावर अनेक कठीण कामं पूर्ण कराल. आर्थिक गोष्टींवर लक्ष द्या. करिअरमध्ये पुढे जाण्याच्या संधी आहेत. सामाजिक भान जपा. कुटुंबाशी असणारं नातं आणखी दृढ होईल.
वृषभ- दिवसभर कामाचा व्याप वाढलेला असेल. आज काही व्यक्ती तुमच्याकडून काम करुन घेतील. जास्त विचार करु नका. काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
मिथुन- व्यापार आणि नोकरीमध्ये कुटुंबाची मदत मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक भूमिका मांडा. आजचा दिवस शुभ आहे. एक नवी सुरुवात होणार आहे. इतरांच्या भावनांचा आदर करा.
कर्क- नव्या व्यवसायाच्या कल्पना आकर्षित करतील. अर्थार्जनात वाढ होणार आहे. जुन्या आठवणींना उजाळा द्याल. आरोग्य सुधारेल. इच्छा पूर्ण होतील.
सिंह- अडकलेले पैसे परत मिळतील. उधार घेतलेले पैसेही परत मिळणार आहेत. आज तुम्हाला इतरांचं सहकार्य मिळणार आहे. मनी असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील. अविवाहितांसाठी विवाहप्रस्ताव येतील.
कन्या- नोकरी आणि व्यवसायात आज फायद्याचा दिवस आहे. वाद मिटतील. नवी सुरुवात कराल. मानसिक शांतता मिळेल. वाहनाचा वापर मात्र सावधगिरीनं करा.
तुळ- कर्जातून मोकळे व्हाल. अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. तुमच्या व्यवहारानं साथीदाराला आनंद होणार आहे. काही नवी पावलं उचलून नव्या सुरुवातीच्या दिशेनं कूच कराल.
वृश्चिक- खासगी समस्या दूर होतील. नातेसंबंध सुधारतील. गुंतवणुकीचा योग आहे. आज कामाच्या व्य़ापातून काहीशी उसंत मिळेल.
धनु- नोकरीमध्ये बढतीची संधी आहे. अडचणींचा काळ संपला आहे. आजचा दिवस शुभ आहे. तणावाची परिस्थिती दूर जाणार आहे.
मकर- आर्थिक परिस्थिती सुधारेल. नव्या करारांचा फायदा होणार आहे. अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. प्रेमसंबंधांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ- नव्या लोकांच्या संपर्कात याल. आर्खित परिस्थिती सुधारेल. गणरायाच्या आगमनानं नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे. जुने वाद मिटतील.
मीन- आज दिवस काहीसा थकवणारा असेल. काळजी घ्या. खर्च करताना विचार करा. आरोग्याची काळजी घ्या. दिवस समाधानकारक असेल.