Ganesh Jayanti 2023: कधी आहे वसंत पंचमी? गणेश जयंती, रथ सप्तमी; जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व
रविवार, 22 जानेवारी म्हणजे आजपासून माघ महिन्याचा शुक्ल पक्ष सुरू झाला आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात माघ विनायक चतुर्थी म्हणजे गणेश जयंती, वसंत पंचमी, सरस्वती पूजा, रथ सप्तमी किंवा अचला सप्तमी असे व्रत येणार आहेत.
Ganesh Jayanti 2023: हिंदू कॅलेंडरचा 11वा महिना माघचा शुक्ल पक्ष आजपासून सुरू झाला आहे. आज माघ शुक्ल प्रतिपदा तिथी आहे. अनेक महत्त्वाचे व्रत आणि सण शुक्ल पक्षात येतात.त्यामुळे जाणून या दिवसाचे महत्त्व आणि पूजा विधी...
25 जानेवारी, दिवस: बुधवार: गणेश जयंती, माघ विनायक चतुर्थी
गणेश जयंती 2023: गणेशजींचा जन्म माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला झाला होता. म्हणून गणेश जयंती माघ शुक्ल चतुर्थीला साजरी केली जाते. यंदा गणेश जयंती 25 जानेवारी म्हणजे बुधवारी आहे. बुधवार हा गणेशाच्या पूजेचाही दिवस आहे. गणेश जयंतीला माघ विनायक चतुर्थी म्हणतात. या दिवशी गणेशाची पूजा विधिवत केली जाते. महाराष्ट्र आणि गोव्यात माघी गणेशोत्सव साजरा केला जातो.
26 जानेवारी, दिवस: गुरुवार: सरस्वती पूजा, वसंत पंचमी, प्रजासत्ताक दिन
सरस्वती पूजा 2023: दरवर्षी सरस्वती पूजा माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते. यंदा सरस्वती पूजा गुरूवारी म्हणजे 26 जानेवारी येत आहे. या तिथीला माता लक्ष्मीचे दर्शन होत असल्याने दरवर्षी माघ शुक्ल पंचमीला सरस्वती पूजन केले जाते.या दिवशी शाळांमध्ये सरस्वती पूजनाचे आयोजन केले जाते.
वाचा: आजपासून माघ, पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
वसंत पंचमी 2023
यावर्षी वसंत पंचमीचा सण 26 जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे. माघ शुक्ल पंचमीलाही वसंत पंचमी साजरी केली जाते. वसंत पंचमी म्हणजे वसंत ऋतूचे आगमन होते. या दिवशी कामदेव आणि रती यांचीही पूजा केली जाते. वसंत पंचमीला कामदेव आणि रती पृथ्वीवर येतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
28 जानेवारी, दिवस: शनिवार: रथ सप्तमी, अचला सप्तमी व्रत
रथ सप्तमी 2023: माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी रथ सप्तमीचा उपवास केला जातो. रथ सप्तमीला अचला सप्तमी असेही म्हणतात. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. त्याच्या कृपेने धन, धान्य, संतती आणि उत्तम आरोग्य मिळते.