Anant Chaturdashi 2023 : अनंत चतुर्दशीला 3 अद्भुत शुभ योग! जाणून घ्या तिथी, पूजाविधी, Ganesh Visarjan शुभ मुहूर्त
Anant Chaturdashi 2023 : यंदाची अनंत चतुर्दशी अतिशय शुभ आणि खास आहे. यादिवशी आपण बाप्पाला निरोप देतो. अनंत चतुर्दशीला बाप्पासोबत विष्णुपूजा केला जाते. अशा या शुभ दिवसाचे तिथी, पूजाविधी, गणपती विसर्जन शुभ मुहूर्त जाणून घ्या.
Ganesh Visarjan / Anant Chaturdashi 2023 : घरोघरी आणि मंडळात विराजमान झालेले बाप्पा अनंत चतुर्दशीला आपल्या गावी जातात. यंदाची अनंत चतुर्दशी अतिशय खास आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला गणेशोत्सवाची सांगता होते. यंदा पंचागानुसार येत्या गुरुवारी म्हणजे 28 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी जैन अनुयायांचा पर्युषण उत्सव (Paryushan Parv 2023) संपतो. तर या दिवशी भगवान विष्णूच्या शाश्वत रूपाची पूजा केली जाते. अशा या शुभ दिवसाचे पूजाविधी, गणपती विसर्जन शुभ मुहूर्त जाणून घेऊयात. (ganesh visarjan anant chaturdashi 2023 date shubh muhurat puja time and lord vishnu and ganpati visarjan time)
अनंत चतुर्दशी 2023 मुहूर्त (anant chaturdashi 2023 muhurat)
पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी 27 सप्टेंबर 2023 ला रात्री 10:18 वाजता सुरु होणार असून 28 सप्टेंबर 2023 ला संध्याकाळी 06:49 वाजेपर्यंत असणार आहे.
विष्णू पूजेची वेळ - सकाळी 06.12 वाजेपासून संध्याकाळी 06.49 वाजेपर्यंत
अनंत चतुर्दशी 2023 गणेश विसर्जन मुहूर्त (ganesh visarjan 2023 shubh muhurat)
पहिला मुहूर्त - सकाली 06.11 वाजेपासून सकाळी 07.40 वाजेपर्यंत
दुसरा मुहूर्त- सकाळी 10.42 वाजेपासून दुपारी 3.10 वाजेपर्यंत
तिसरा मुहूर्त- दुपारी 4.41 पासून रात्री 9.10 वाजेपर्यंत
अनंत चतुर्दशी 3 अद्भुत शुभ योग
अनंत चतुर्दशीला वृद्धी योग असा शुभ योग असून तो शुभ कार्यासाठी सर्वात्तम मानला जातो. त्याशिवाय या दिवशी रवियोग असणार आहे. सकाळी 06:12 पासून रवि योग दिवसभर असणार आहे. तर या दिवशी दुपारी 1.48 पर्यंत पूर्वा भाद्रपद नक्षत्र आहे. शुभ कार्यासाठी हे नक्षत्र उत्तम मानलं जातं.
अनंत चतुर्दशी पूजा विधी
सकाळी लवकर उठून आंघोळ करु स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर पूजास्थानी गंगाजल शिंपडून पवित्र करा. इथे एका पाटावर भगवान विष्णूची मूर्ती किंवा चित्र ठेवून पूजा करा. अक्षता, फुलं, धूप, दिवा, नैवेद्या, अत्तर, चंदन अर्पण करा. त्यानंतर विष्णूची आरती करा आणि मंत्रांचा जप कर. त्यानंतर रक्षासूत्र धारण करा.
अनंत चतुर्दशीला 14 गाठी रक्षासूत्र का बांधतात?
शास्त्रानुसार रक्षासूत्र बांधल्याने जाचकाच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक गोष्टी दूर होतात. त्याशिवाय रक्षासूत्र बांधताना 14 गाठी नक्की बांधा. 14 गाठी म्हणजे भगवान विष्णूच्या 14 रुपांचं प्रतीक आहे.
रक्षासूत्र बांधण्याचा मंत्र
अनंन्तसागर महासमुद्रे मग्नान्समभ्युद्धर वासुदेव।
अनंतरूपे विनियोजितात्माह्यनन्तरूपाय नमो नमस्ते॥
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)