Right way to put haldi kunku : सणासुदीच्या दिवसांमध्ये अनेकदा घरात कोण सुहासिनी महिला किंवा कुमारिका आली, तर तिला हळद- कुंकू लावल्याशिवाय घराबाहेर पडू दिलं जात नाही. सध्या तुम्ही कुठं गणपतीसाठी (Ganeshotsav 2022) गेलात तर, तिथेही कपाळावर कुंकू लावलंच जातं. विवाहितेसाठी ‘कुंकू’ हा सौभाग्यालंकारच. (Ganeshotsav 2022 Right way to put kunku )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुंकू लावण्याचे फायदे
- सहसा कुंकू दोन भुवयांच्या मध्ये किंवा भुवयांच्या वर, कपाळाच्या मध्यङागी लावलं जातं. अशा वेळी त्या भागात काहीसा दाब दिला जातो. हे तेच बिंदू असतात ज्यामुळं चेहर्‍याच्या स्नायूंचा रक्तपुरवठा सुरळीत होतो. कपाळावरील स्नायूंचा ताण कमी होऊन चेहरा उजळ दिसतो.


वाचा: Palmistry: हातावर या रेषा असतील तर लग्नानंतर नशिबात मोठे भाग्य; पैशांचा पाऊस पडेल!


असं म्हणतात की, कुंकवामुळे शरीरारत नकारात्मक शक्तींना शिरण्यात अडथळा निर्माण होतो.


कुंकू कधी आणि कसं लावावं? (When and how to put kunku)
अंघोळ झाल्यानंतर उजव्या हाताच्या अनामिकेने कपाळावर कुंकू लावणं फायद्याचं ठरतं. असं केल्यामुळं शरीरात कुंकवाची ताकद संचारते असं म्हणतात. 


कोणा दुसऱ्या व्यक्तीला कुंकू लावायचं झाल्यास, मध्यमेचा वापर करण्याचा सल्ला शास्त्र देतं. पुरुष किंवा महिला, दुसर्‍यांना कुंकू लावतांना मध्यमेचा वापर करणं फायद्याचं ठरतं अशी मान्यता आहे. 


दुसर्‍या व्यक्तीला स्पर्श करताना त्याच्यातील वाईट शक्तींचा संचार आपल्या शरीरात बोटाच्या माध्यमातून होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत मध्यमा बोटाचं बळ ते थोपवून धरतं आणि आपल्या शरीराचं रक्षण करतं. 


(वरील माहिती सर्वसामान्य मान्यतांवर आधारित आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)