Garud Puran: गरुड पुराणातील या गोष्टींचं पालन केल्यास मिळतो देवी लक्ष्मीचा आशीर्वाद
Garuda Purana प्रमाणे कोणत्या गोष्टींचे पालन करायला हवे आणि त्यानं काय फायदा होतो हे जाणून घ्या, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित नाहीत...
Garuda Purana : हिंदू धर्मात पुराणाला महत्वाच्या महापुराणाचा दर्जा देण्यात आला आहे. गरुड पुराणात मनुष्याचा मृत्यू आणि त्यानंतर आत्म्याच्या प्रवासाचे तपशीलवार वर्णन केले आहे. म्हणूनच लोक सामान्यतः गरुड पुराण केवळ मृत्यूशी संबंधित असल्याचे मानतात. परंतु गरुड पुराणात मृत्यविषयी माहितीशिवाय यशस्वी, आनंदी आणि चांगले जीवन जगण्याचे अत्यंत प्रभावी मार्ग सांगितले आहेत. त्यात श्रीमंत होण्याचे मार्ग देखील समाविष्ट आहेत. गरुड पुराणानुसार ज्या घरांमध्ये रोज काही गोष्टी नित्य नियमाने केल्या जातात त्या घरात लक्ष्मीचा वास असतो. त्या घरात कधीच संपत्तीची कमी नसते. जाणून घ्या कोणते आहेत हे उपाय...
लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणत काम करायला पाहिजे, जाणून घ्या
देवाला नैवेद्य : घरामध्ये रोज अंघोळ केल्यानंतर जेवण बनवण्यात येते. यासोबतच घरात बनलेलं जेवण हे सगळ्यात आधी देवाला नैवेद्य देण्यात येते त्या घरात कधीच धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. अशा घरात देवी-देवतांची कृपा असते.
धार्मिक ग्रंथांचे पठण : ज्या घरात दररोज धार्मिक ग्रंथ व मंत्रांचे पठण केले जाते. त्याचबरोबसर पूजा, जप, आरती केली जाते त्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी असते. ज्या घरातील सदस्यांची धर्म, संस्कृती आणि ईश्वरावर श्रद्धा असते. या लोकांवर लक्ष्मी देवीचा सदैव आशीर्वाद असतो.
दान-धर्म : ज्या घरातील लोक दानधर्माला महत्व देतात. ज्या घरांमध्ये ऋषी-मुनीं, योगी व्यक्तींचा आदर केला जातो. ज्या लोकांच्या घरातून एकही गरीब किंवा भिकारी रिकाम्या हातानं जात नाही, त्या घरावर लक्ष्मी देवीची कृपा असते. अशा घरात पैशाची आणि धान्याची कमी राहत नाही.
हेही वाचा : 'मला माझ्या मित्रांमुळे...', Neena Gupta यांचा बॉलिवूडमध्ये काम मिळवण्याविषयी मोठा खुलासा
कुलदेवतेची पूजा: प्रत्येक कुटुंबाची स्वतःची एक कुलदेवी- देवता असतात. ज्या घरांमध्ये कुलदेवी-कुलदेवतेची पूजा केली जाते. त्यांची नेहमी प्रगती होते आणि भरपूर संपत्ती मिळते. गरुड पुराणानुसार घरातील कुलदेवता प्रसन्न झाल्यास पुढील सात पिढ्या सुखी राहतात.
प्रेम : ज्या घरांमध्ये लोक एकमेकांसोबत प्रेमाने राहतात. मोठ्यांचा आदर केला जातो, लहानांना चांगली आणि प्रेमाची वागणूक दिली जाते, त्या घरांमध्ये लक्ष्मीमाता सदैव वास करते आणि खूप आनंद आणि समृद्धी देते. (garuda purana says devi laxmi always stays in these homes how to please maa lakshmi)
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)