Ghat Visarjan 2022 : घट कसा, कोणी, कधी उठवावा; Video मधून समजून घ्या संपूर्ण विधी
Ghat Visarjan 2022: घट कसा, कोणी, कधी उठवावा आणि उपवास नेमका कधी सोडावा याबद्दल जाणून घेऊयात.
Ghat Visarjan 2022: देशभरात नवरात्रीची (Navratri 2022) धूम सुरु आहे. घरोघरी महिलांनी घटस्ठापना (Ghatsthapana 2022) आणि अखंड दिवाची पूजा सुरु आहे. सार्वजनिक मंडपात देवीचं आराधना केली जातंय. अनेक जण नवरात्रीचे 9 दिवस उपवास करतात. आपण घटस्थापना कशी करायची याबद्दल जाणून घेतलं आहे. आता हा घट कसा, कोणी, कधी उठवावा आणि उपवास नेमका कधी सोडावा याबद्दल जाणून घेऊयात.
घट विसर्जन 2022 कुठल्या दिवशी आहे? (Ghat Visarjan date 2022)
आश्विन शुद्ध दशमी म्हणजे विजयादशमी (Vijayadashami 2022) ...म्हणजेच दसरा 2022...(Dussehra 2022) घटची स्ठापना केल्यानंतर 9 दिवस त्याची आराधना केली जाते. घटला रोज एक माळ अपर्ण केली जाते. 9 दिवस घटस्थापना केल्यावर 10 व्या दिवशी दसरा साजरा केला जातो. म्हणजे याच दिवशी दसऱ्याला घट विसर्जन केलं जातं. तर काही जण कुळाचाराप्रमाणे 9 वीला तर कोणी दशमीला घट विसर्जन करतात. (ghat visarjan muhurat 2022 marathi Video nm) तर यावर्षी घटाचं विसर्जन 4 ऑक्टोबर 2022 मंगळवारी म्हणजे खंडे महानवमीला केलं जाणार आहे.
घट विसर्जन 2022 शुभ मुहूर्त (Ghat Visarjan shubh muhurat 2022)
शास्त्रानुसार 4 ऑक्टोबर 2022 (4 October 2022) मंगळवारी (Tuesday) सकाळी 11 पासून दुपारी 2 वाजतेपर्यंत शुभ मुहूर्त आहे.
घट कोणी उठवायचा?
घट कधीही स्त्रीयांनी उठवू नये. घट कायम पुरुषांनी उठवावा, असं शास्त्रात सांगितलं आहे. शास्त्रानुसार घट उठवण्यासाठी 5 पुरुष किंवा 5 लहान मुलं बोलवायला पाहिजे.
उपवास कधी सोडायचा?
घट विसर्जन झाल्यावर म्हणजे 4 ऑक्टोबर 2022 ला तुम्ही 12.30 ते 5 दरम्यान तुम्ही उपवास सोडू शकता. याशिवाय घटस्थापनेसाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचं काय करायचं याबद्दल हा व्हिडीओ पाहा...