मुंबई : प्रत्येक राशीच्या व्यक्तींचा स्वभाव हा वेगळा असतो. दरम्यान स्वभावामध्ये मुलींना खूप टार्गेट केलं जातं. काही मुली खूप रागीष्ट असतात तर काही हट्टी असतात. काहींना एकटं राहणं आवडतं तर काही सर्वांसोबत राहणं पसंत करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशींच्या मुलींना आपल्या रागावर नियंत्रण ठेवता येत नाही. या राशींवर ग्रहांचा प्रभाव असतो. जेव्हा हे ग्रह शुभ आणि अशुभ असतात, त्यानुसार त्याचा परिणाम दिसून येतो. चला तर मग जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.


धनु 


या राशीच्या मुलींचा स्वभाव खूप रागीट असल्याचं मानलं जातं. त्यांना त्यांचं आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगायला आवडते. त्यांच्यावर कोणी वर्चस्व गाजवलेलं त्यांना आवडत नाही. इतकंच नाही कोणीही त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही तर त्यांना राग येतो.


कुंभ


'या' राशीच्या मुली खूप हुशार असतात. त्या प्रत्येक गोष्टीत त्यांची हुशारी दाखवतात. त्यांना राग पटकन येत नसला, तरी जेव्हा येतो तेव्हा तो खूप लवकर येतो. या मुली समोरच्या व्यक्तीला इतकं चांगलं-वाईट सांगतात की, त्यांचं नातं तुटण्याची शक्यता असते.


कर्क


या राशीच्या मुलींना फार लवकर राग येतो. अशा मुलींना अगदी गोष्टीचंही वाईट वाटतं. रागाच्या भरात त्यांचा बोलण्यावर देखील ताबा राहत नाही. अशावेळी ते समोरच्या व्यक्तीला खूप वाईट बोलू शकतात. या मुलींना शांत करणं खूप कठीण असतं.


(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचं समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)