मुंबई : आज कोणत्याही क्षेत्रात मुली स्वतःचं कतृत्व सादर करत एक वेगळी ओळख निर्माण करत आहेत. प्रत्येक मुलीला स्वतःच्या पायावर भक्कम उभं राहण्याचा आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याचा हक्क आहे. ज्योतिष शास्त्रानुसार काही राशींच्या मुली फक्त घरातचं नाही, तर कामाच्या ठिकाणी स्वतःच्या बळावर एक वेगळी ओळख निर्माण करतात. अशाचं राशींच्या मुलींबद्दल आज जाणून घेऊ....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिथुन - ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन राशीच्या मुली प्रत्येक काम उत्साहाने करतात. या राशीच्या मुली प्रत्येक कम हुशारीने आणि कमी वेळात करतात. याचं कारणामुळे मिथुन राशींच्या मुली कोणत्याही क्षेत्रात यश मिळऊ शकतात. मिथुन राशींच्या मुली प्रत्येक काम पूर्ण मनाने करतात. योजना करण्यात या मुली पुढाकार घेतात, एवढंच नाही तर दिलेली प्रत्येक जबाबदारी पूर्ण करतात. 


मिथुन राशींच्या मुलींना लक्ष्मीचा आशीर्वादही मिळतो. त्या खूप मेहनती असतात, याच जोरावर मिथुन राशीच्या मुली स्वतःची स्वप्ने साकार करतात. या राशीच्या मुलींना राग आणि अहंकार टाळण्याचा कायम सल्ला दिला जातो.  मिथुन राशीच्या मुलींचे नाव 'अ', 'च' आणि 'ड' ने सुरू होते.


सिंह - सिंह राशीच्या मुली प्रत्येक गोष्टी संयमाने सांभाळून घेतात. या राशींच्या मुली प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतात. आपले ध्येय साध्य करण्यासाठी ते काहीही करण्यास तयार असतात. कोणत्याही कामात अयशस्वी झाल्यास सिंह राशीच्या मुली घाबरत नाही. त्यापेक्षा धैर्याने सामोरे जा. या मुली सहजासहजी माघार घेत नाहीत. नोकरी-व्यवसायात मुली वेगळी ओळख निर्माण करतात. 


त्याचबरोबर घरची जबाबदारीही सिंह राशीच्या मुली पूर्ण निष्ठेने पार पाडतात. सिंह राशीच्या मुली मेहनती आणि कष्टाळू असतात, त्यामुळे त्या आयुष्यात काहीही साध्य करतात. सहकाऱ्यांकडून काम करून घेणे त्यांना चांगलेच जमतं. त्यामुळे या राशींच्या मुली चांगल्या लिडर सिद्ध होतात. 


सिंह राशीच्या मुली इतरांवर लवकर विश्वास ठेवतात. त्यांनी इतरांवर लवकर विश्वास ठेवू नये. कोणतेही काम पूर्ण होण्यापूर्वी ती बाब कोणाशीही सांगणे टाळावे. सिंह राशीच्या मुलींच्या नावाची सुरुवात मा, मी, मू, मी, मो, टा, ती, तू, तय याने होते. 


वृश्चिक - ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीच्या मुली त्यांच्या कोणत्याही कामात गंभीर असतात. कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये यासाठी त्या नेहमीच प्रयत्न करताात. कोणत्याही धोक्याची बातमी त्यांना आधीच कळते आणि या कारणास्तव, त्या स्वतःची रणनीती खूप लवकर बदलतात. घर असो किंवा ऑफिस, त्यांना सर्वत्र यश मिळते. 


योजना बनवून काम करणाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यांना एकटे फिरणे आवडत नाही तर ग्रुपमध्ये राहणं या राशीच्या मुलींना आवडत. राशीच्या मुलींच्या नावाची सुरुवात ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू याने होते.