Chanakya Niti: या कामांसाठी निसंकोचपणे करा खर्च, आयुष्यभर राहील लक्ष्मीची कृपा
आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्राची आजही तितकीच चर्चा होत असते. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात मांडलेल्या धोरणं आजही तंतोतंत लागू होतात.
Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्राची आजही तितकीच चर्चा होत असते. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात मांडलेल्या धोरणं आजही तंतोतंत लागू होतात. त्यामुळे इतकी वर्षे उलटूनही आचार्य चाणक्य यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे चाणक्य नीतितील एखादा श्लोक समोर आला की उत्सुकता वाढते. आचार्य चाणक्य यांनी आपले अनुभव नीतिशास्त्रात मांडले आहेत. यामुळे जीवनात येणाऱ्या संकटांचा सामना करता येईल. इतकंच नाही तर नीतिशास्त्राचं अनुसरण केल्यास प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं. आचार्य चाणक्य यांनी पैसा कसा टिकवून ठेवावा याबाबत सांगितलं आहे. पण काही ठिकाणी निसंकोचपणे पैसा खर्च केल्या देवी लक्ष्मीची कृपा होते, असा उल्लेख आहे.
धार्मिक स्थळांना दान करा: धार्मिक कार्यांसाठी पैशांचं दान केल्याने पुण्य मिळते. मंदिर किंवा धार्मिक स्थळांना निसंकोचपणे दान करावं. यामुळे पुण्य पदरात पडतं. त्याचबरोबर जीवनात सकारत्मकता येते.
आजारी व्यक्तीला मदत: आजारी व्यक्तींना निसंकोचपणे मदत करावी. एखाद्या व्यक्तीच्या आजारपणात कसलाही विचार न करता मदत करा. या मदतीमुळे माणसाला नवजीवन मिळते. एखाद्याचा जीव वाचवणे हे परोपकाराचे सर्वात मोठे कार्य मानले जाते. एखाद्या व्यक्तीला आजारपणात मदत केल्याने जे पुण्य प्राप्त होते. तसेच यश आणि प्रगतीचे नवीन मार्ग उघडते.
गरिबांना मदत करा: जर एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला मदतीची गरज असेल तर जरूर करा. यापेक्षा दुसरे पुण्य काहीही असू शकत नाही. गरीब आणि गरजूंच्या आशीर्वादाने अशा कामांसाठी खर्च होणारा पैसा भरपूर फळ देतो. मदत केल्याने त्या व्यक्तीला मान-सन्मान मिळतो. यासोबतच परलोकातही फळे मिळतात.
सामाजिक कार्यात दान करा: प्रत्येक व्यक्तीने आपल्या कमाईचा काही भाग सामाजिक कार्यासाठी द्यावा. रुग्णालय, शाळा, धर्मशाळा इत्यादी इमारतींचे बांधकाम आणि इतर सामाजिक कार्यात लोकांनी आपल्या क्षमतेनुसार देणगी द्यावी. यामुळे चांगलं पुण्य पदरात पडतं.